एसएफआयकडून पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना मारहाण
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये (Savitribai Phule Pune University) स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, लोकायत अशा विविध संघटना मिळून विद्यार्थ्यांची दमदाटी करून (Pune News) बळजबरीने सदस्यता करण्यात येत होती. यादरम्यान काही विद्यार्थ्यांनी सदस्यता करण्यास नकार दिल्यानंतर एसएफआय व लोकायतच्या गुंडांनी विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) केला आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करीत असताना अभाविपच्या कार्यकर्त्यांना देखील मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अभाविपने एसएफआय आणि लोकायतच्या दोषी कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.