मराठा आरक्षणासाठी आज पुण्यात कडकडीत बंद, मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट
मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या राज्यभरातील आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता पुण्यातील मार्केट यार्ड (Market Yard) येथील तरकारी, किराणा व भुसार बाजारातील व्यापाऱ्यांनी (Pune News) आज बंद ठेवला. दररोज कोट्यावधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या मार्केट यार्ड मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.
मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शविण्यात आला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असते. राज्यभरातून आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्र मधून मोठ्या प्रमाणावर शेतकरी आपला शेतमाल घेऊन या ठिकाणी येत असतात. या भागामध्ये कायमच गजबज आणि वाहतूक कोंडी असते. मात्र, कडकडीत बंद पाळण्यात येत असल्यामुळे आज शुकशुकाट दिसत होता. या बंदमध्ये आडते, व्यापारी, गाळेधारक, हमाल, मजूर, कामगार असे सर्वच सहभागी झाल्याचे सांगण्यात आले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.