संग्रहित छायाचित्र
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात शरदचंद्र आरोग्य अभियान राबवण्यात येणार आहे. या आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सतीश कांबळे यांनी केले आहे. माजी केंद्रीय मंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार हे १२ डिसेंबर रोजी ८५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र व डॉक्टर सेल यांच्या माध्यमातून राज्यभरात शरदचंद्र आरोग्य अभियान राबवण्यात येत आहे.
आरोग्य अभियान १२ डिसेंबर २०२४ ते १२ जानेवारी २०२५ पर्यंत असणार आहे. यामध्ये मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया तसेच ‘कृत्रिम हात व पाय वाटप अभियान’, ‘मोफत डोळ्यांचे तिरळेपणावर शस्त्रकीया’, ‘कॅन्सर आजारावर शस्त्रक्रिया व महागडी चाचणी पेट स्कॅन फक्त रु. ७०००/-’, ‘मोफत गुडघा व खुबा सांधेरोपण शस्त्रक्रिया अभियान’, ‘मोफत प्रेग्नेंसी तसेच सिजरिंग शस्त्रक्रिया’, ‘मोफत दिव्यांग व्यक्तींकरिता इलेक्ट्रीकॅल बाइसिकल व कानाच्या श्रवण यंत्र वाटप’, ‘मोफत हृदयावरील शस्त्रक्रिया / अल्प दरात अँजिओग्राफी रु. १९९९/-’ या योजनांचा लाभ राज्यभरातील रुग्णांना घेता येईल. आरोग्य अभियानाच्या उद्घाटन आमदार रोहित पवार, आमदार बापूसाहेब पठारे, पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे, प्रशांत जगताप, विकास पासलकर, तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सेल डॉ. सुनील जगताप, शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र राज्य प्रमुख डॉ. सतीश कांबळे उपस्थित होते, तसेच विठ्ठल शेठ मणियार यांच्या शुभहस्ते शरदचंद्र आरोग्य अभियानाचे लोकार्पण करण्यात आले.
राज्यातील आरोग्य सेवा या खूप महागड्या झाल्या आहेत. ज्या सर्वसामान्य लोकांच्या आटोक्याबाहेर जात आहेत. राज्यातील जनतेने या आरोग्य अभियानाचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत आरोग्य अभियान पोहोचवावे हा आमचा एक प्रयत्न आहे. आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे हे लक्षात घेऊन राज्यातील जनतेला निरोगी आयुष्य देण्याचा हा एक संकल्प शरदचंद्र पवार यांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. या योजनेचा लाभ घेण्याकरिता हेल्पलाइन नंबरवर कॉल करून रुग्णांनी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.