पुण्यातून जालना, बीड,लातूरकडे जाणाऱ्या एसटी बस बंद
मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलकांनी (Maratha proteste) आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळते. विशेषतः मराठवाड्यातील संभाजीनगर जालना बीड या भागातील आंदोलन गेल्या काही दिवसांपासून (Pune News) तीव्र झालेला पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातून जालना बीड लातूरकडे जाणाऱ्या बस सेवा (ST bus) बंद ठेवण्याचा निर्णय एसटी (Manoj Jarange Patil) महामंडळाने घेतलेला आहे.
एस टी महामंडळाला पोलीस प्रशासनाने केलेल्या विनंतीनुसार एसटी महामंडळाने आजपासून जालना बीड लातूरकडे जाणाऱ्या बस सेवा बंद केलेल्या आहेत. तर संभाजीनगर कडे जाणारी बस सेवा सध्या तरी सुरू असून ती केवळ नगरपर्यंत व्यवस्थित सुरू आहे. नगरच्या पुढे जर वातावरण सुरळीत असेल तरच नेण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतल्याचे प्रवाशांनी सांगितलेला आहे.
त्याचबरोबर येथे काही दिवसांमध्ये दिवाळीच्या सणाला देखील सुरुवात होते. त्यामुळे प्रवाशांची लगबग ही जाण्यासाठी एसटी स्थानकावर ती पाहायला मिळते. परंतु सध्या बस सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांमध्ये निराशा झालेली पाहायला मिळते. त्यामुळे आता एसटी महामंडळाला देखील या संपूर्ण मराठा आरक्षणाचा फटका बसतोय की काय हे पाहणे महत्त्वाचा ठरणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.