अभिप्राय द्या अन्यथा नोकरी थांबवा

ज्या प्राध्यापकांनी मास्टर ऑफ फिलॉसॉफी (एम.फिल.) पदवी घेतली आहे, परंतु नेट-सेट परीक्षेतून सूट मिळवण्यासाठीचे अभिप्राय प्रस्ताव सादर केलेले नाहीत, त्यांनी आता ३१ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. या मुदतीमध्ये जर प्रस्ताव सर्व त्रुटींच्या पूर्ततेसह अभिप्राय सादर केले नाहीत तर त्यांची नोकरीदेखील धोक्यात येऊ शकणार आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

एम. फिल अर्हताधारक १,४४७ प्राध्यापकांना नेट-सेटमधून सूट मिळवण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत

ज्या प्राध्यापकांनी मास्टर ऑफ फिलॉसॉफी (एम.फिल.) पदवी घेतली आहे, परंतु नेट-सेट परीक्षेतून सूट मिळवण्यासाठीचे अभिप्राय प्रस्ताव सादर केलेले नाहीत, त्यांनी आता ३१ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. या मुदतीमध्ये जर प्रस्ताव सर्व त्रुटींच्या पूर्ततेसह अभिप्राय सादर केले नाहीत तर त्यांची नोकरीदेखील धोक्यात येऊ शकणार आहे.

ज्या प्राध्यापकांनी ११ जुले २००९ पूर्वी एम.फिल. पदवी धारण केली आहे. त्यांना नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण करण्यापासून सूट मिळवण्यासाठीचे प्रस्ताव त्रुटींची पूर्तता करून उच्च शिक्षण संचालनालयास पुन्हा सादर करण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत या प्राध्यापकांचे प्रस्ताव त्रुटींची पूर्तता आणि अभिप्रायासह सादर केले नाही तर या प्राध्यापकांचे त्रांगडे होण्याची शक्यता आहे. राज्यातील १२ विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयातील १ हजार ४४७ प्राध्यापक हे ११ जुलै २००९ पूर्वी एम.फिल.ही पदवी धारण केलेले आहेत. त्यांना नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबतचे प्रस्ताव उच्च शिक्षण संचालनालयामार्फत विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठवण्यात आले होते.

नेट-सेटमधून सूट देण्यासाठी पाठवण्यात आलेल्या १,४४७ प्राध्यापकांच्या प्रस्तावांची तपासणी करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. नेट-सेटमधून सूट मिळवण्यासाठी निर्धारित अटींची पूर्तता करणाऱ्या १,४४७ जणांचे प्राध्यापकनिहाय प्रस्ताव संक्षिप्त माहितीस्तव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे ६ सप्टेंबर २०२४ पूर्वी सादर करण्याबाबत राज्यातील १२ विद्यापीठांच्या कुलसचिवांना उच्च शिक्षण संचालनालयाने कळवले होते.

राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर म्हणाले की, विद्यापीठांनी यूजीसीकडे सादर केलेल्या प्रस्तावांची तज्ज्ञ समितीमार्फत तपासणी करण्यात आली. या तपासणीत समितीला या प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्वयंस्पष्ट अभिप्रायांसह प्रकरणनिहाय त्रुटी आणि कागदपत्रांची पूर्तता करून हे प्रस्ताव उच्च शिक्षण संचालनालयास सादर करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२४ ची मुदत देण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्र राज्यातील १२ विद्यापीठांच्या कुलसचिवांना २३ डिसेंबर रोजी पाठवले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest