Pune News : पुणे रेल्वे स्टेशनवर रिक्षा चालक भिडले, प्रीपेड रिक्षा बूथ बंद पाडण्यासाठी गुंडगिरी

पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची आडवणूक करुन मनमानी भाडे आकारणी करणाऱ्या रिक्षा चालकांना पुणे वाहतुक पोलिसांनी चाप बसविला आहे. ‘प्रीपेड ऑटो रिक्षा’ या सेवेअंतर्गतच बूथमध्ये नोंदणी केलेल्या रिक्षा चालकांना स्टेशनवरील प्रवाशांना वाहतूक सेवा देता येते.

Pune News : पुणे रेल्वे स्टेशनवर रिक्षा चालक भिडले, प्रीपेड रिक्षा बूथ बंद पाडण्यासाठी गुंडगिरी

पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची आडवणूक करुन मनमानी भाडे आकारणी करणाऱ्या रिक्षा चालकांना पुणे वाहतुक पोलिसांनी चाप बसविला आहे. ‘प्रीपेड ऑटो रिक्षा’ या सेवेअंतर्गतच बूथमध्ये नोंदणी केलेल्या रिक्षा चालकांना स्टेशनवरील प्रवाशांना वाहतूक सेवा देता येते. मात्र या बूथवर नोंदणी न केलेल्या रिक्षाचालकांचा उपद्रव वाढला असून काही गुंड रिक्षा चालकांची दादागिरी करत प्रीपेड रिक्षा बूथ बंद पाडण्यासाठी रिक्षा चालकांना मारहाण केला असा आरोप नोंदणीकृत रिक्षा चालकांनी केला आहे. अशी माहिती भारतीय गीत कामगार मंचचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी दिली. 

पुणे रेल्वे स्थानक परिसरातील ‘प्रीपेड ऑटो रिक्षा’ बुथ प्रवाशांसाठी एक प्रकारे सुखी प्रवासी सेवा देणारे वरदान ठरले आहे. ही सुविधा सुरू झाल्यापासून प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रेल्वे स्थानकातील परिसरात मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला प्रीपेड ऑटो रिक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. आतापर्यंत बाराशे ५० रिक्षाचालकांनी नोंदणी केली आहे. प्रवाशांना नियोजित ठिकाणी जाण्यासाठी अगोदरच ऑनलाइन शुल्क घेतले जात आहे. त्यामुळे तक्रारी, वादविवाद या घटनांना पूर्णत: आळा घालता येणे शक्य झाले आहे. तसेच बेकायदा रिक्षाचालकांकडून प्रवाशांची होणारी लूटमार रोखण्यात फायदा होत आहे. प्रवासी सेवा संघाचा करार संपुष्टात आल्यानंतर तीन महिन्यांपासून ही सुविधा बंद झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला होता. परंतु आता ही सेवा झाल्याने आता रेल्वे स्थानकावर प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये सध्यातरी आनंदाचे वातावरण आहे. या आनंदात रिक्षा चालकांच्या मारहाणीमुळे विरजन पडले आहे. 

स्टेशनवर गुंड रिक्षाचालक तेथे येणाऱ्या नोंदणीकृत कायदेशीर रिक्षा चालकांना मारहाण करत आहेत. याबाबत असून अनेक तक्रारी करून सुद्धा पोलिसांनी आजतागायत कोणतीही कारवाई केलेली नाही. अशाच प्रकारे गेल्या महिन्यात सुद्धा महिला रिक्षा चालकांचा विनयभंग केल्यावर गुन्हा दाखल न केल्यामुळे आरोपी मोकाट असल्याने सदर बूथ वरती महिला रिक्षा चालकांनी येणे बंद केले आहे.  दहशत पसरवून प्रामाणिकपणे कायदेशीर व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांना बूथ वरून पळून लावून नागरिकांना लुटण्यासाठी अशा प्रकारे गुंडागर्दी तेथील रिक्षा चालकांकडून होत आहे. सरकारी दराने बूथवर व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकाला तेथील एका गुंड रिक्षाचालकांच्या टोळक्याने जबर मारहाण केली. असे रिक्षा चालकांनी सांगितले. 

दरम्यान प्रीपेड ऑटो बुथवर वाहतुक पोलिसांचे नियंत्रण आहे. त्यामुळे पोलिसांनी रिक्षा चालकांवर अन्याय होणार नाही, यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी विविध रिक्षा संघटनांनी केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest