संग्रहित छायाचित्र
पुणे-नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात भरधाव मोटारीची धडक लागून झालेल्या अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर मोटारचालक घटनास्थळावरुन पसार झाला. त्याच्याविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विष्णू हरी भटोराय (वय ४७, सध्या रा. वाडे गाव, ता. शिरुर, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या पादचारी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी लोकबहाद्दुर नरबिक (वय ३७) यांनी लोणीकंद (वाघोली) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भटोराय आणि नरबिक मित्र आहेत. हे दोघेही मजूरी करून गुजराण करतात. हे दोघेही ८ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वाघोली परिसरातून निघालेले होते. कटकेवाडी परिसरातील हॅाटेल शौर्यवाडा समोर भरधाव मोटारीने भटोराय यांना धडक दिली. गंभीर जखमी भटोराय यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.