‘त्या’ ठेकेदाराला महापालिकेने बजावली कारणे दाखवा नोटीस

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कामाची गुणवत्ता तपासणी केली असता हिंगणे येथील एका खांबाच्या कामात सिमेंटचा दर्जा निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेने हा खांब सुमारे दीड मीटर फोडून नव्याने काम करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 1 Sep 2023
  • 04:36 pm
Show cause notice

‘त्या’ ठेकेदाराला महापालिकेने बजावली कारणे दाखवा नोटीस

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कामाची गुणवत्ता तपासणी केली असता हिंगणे येथील एका खांबाच्या कामात सिमेंटचा दर्जा निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेने हा खांब सुमारे दीड मीटर फोडून नव्याने काम करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले होते.

राजाराम पूल ते फनटाईम थिएटरपर्यंत उड्डाणपूल उभारला जात असून, हे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. ज्या भागात खांबांचे काम पूर्ण झाले आहे तेथे गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. संतोष हॉल चौक ते राजाराम पूल या दरम्यान गर्डर टाकण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. कामाच्या गुणवत्तेची तपासणी त्रयस्थ संस्थेकडून करण्यात आली. त्यामध्ये संतोष हॉल चौक ते विठ्ठलवाडी दरम्यानच्या दहा खांबांची तपासणी झाली. हिंगणे येथील एका खांबाच्या सिमेंटची गुणवत्ता ‘एम ३५‘ असणे आवश्यक असताना ती ‘एम ३०‘ इतकी असल्याचे आढळून आले. त्याबाबतचा अहवाल प्रकल्प विभागाला प्राप्त झाला. त्यानंतर तेथील काम बंद करण्यात आले. हा खांब झाकण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील इतर कामेही खोळंबली आहेत.

प्रकल्प विभागाकडून ही चूक ठेकेदाराच्या लक्षात आणून देण्यात आली. नवे काम पूर्ण झाल्यानंतरच पुढील काम सुरू होईल.  महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, संपूर्ण प्रकल्पाचा अहवाल सादर करण्‍याचे आदेश देण्यात आले आहेत.  कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest