कोथरूडमधील प्रत्येक नागरिकाची सेवा हाच ध्यास : चंद्रकांत पाटील

पुणे : कोथरुड मधील प्रत्येक नागरिक सुखी आनंदी राहण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असून; कोथरुडकरांची सेवा हाच एकमेव ध्यास असल्याचा संकल्प भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केला.

गोसावी वस्ती, नवीन शिवणे मध्ये पदयात्रा आणि चौक सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : कोथरुड मधील प्रत्येक नागरिक सुखी आनंदी राहण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असून; कोथरुडकरांची सेवा हाच एकमेव ध्यास असल्याचा संकल्प भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केला. महायुतीच्या प्रचारार्थ आज कोथरूड मधील गोसावी वस्ती, नवीन शिवणे भागात चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. 

यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, माजी नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, प्रभाग १३ च्या अध्यक्षा ॲड प्राची बगाटे, सरचिटणीस गिरीश खत्री, दिपक पवार यांच्या सह भागातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित कार्यकर्ते उपस्थित होते. 

भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोथरूड हे कुटुंब मानून गेल्या पाच वर्षांत जी काही कामे किंवा उपक्रम कोथरुड विधानसभा मतदारसंघात राबविले; ते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राबविले नाहीत. उलट सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी केले. त्यामुळे कोथरूडकरांची सेवा हाच एकमेव ध्यास असून; पुढेही कोथरुड मतदारसंघातील सेवा उपक्रम सुरुच राहणार आहेत. 

ते पुढे म्हणाले की, राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना ही उच्च शिक्षणाची संधी मिळावी, अशी माझी नेहमीच आग्रही भूमिका राहिली आहे. कोविडनंतर मुलींना शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये यासाठी लोकसहभागातून अनेक आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींची शैक्षणिक शुल्क भरण्यास मदत केली. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा निर्णय घेतला‌. त्यासाठी ९०० कोटींची तरतूद केली. याशिवाय कोविडनंतर अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देऊन हातभार लावला, अशी भावना ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story