स्वत:वरील विश्वास हेच यशाचे गमक

'संघर्ष प्रत्येकालाच करावा लागतो, त्यागाशिवाय यशाची चव चाखता येत नाही. त्यामुळे यूपीएससी निकालात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी तयारीच्या काळात केलेला त्याग मी समजू शकतो', अशी भावना पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी व्यक्त केली. द युनिक अकॅडमीच्या यूपीएससी निकालातील यशवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ढाकणे बोलत होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 2 Jun 2023
  • 09:33 am
स्वत:वरील विश्वास हेच यशाचे गमक

स्वत:वरील विश्वास हेच यशाचे गमक

द युनिक अकॅडमीच्या सत्कार सोहळ्यात अतिरिक्त आयुक्तांनी दिला मूलमंत्र

#पुणे

'संघर्ष प्रत्येकालाच करावा लागतो, त्यागाशिवाय यशाची चव चाखता येत नाही. त्यामुळे यूपीएससी निकालात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी तयारीच्या काळात केलेला त्याग मी समजू शकतो', अशी भावना पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी व्यक्त केली. द युनिक अकॅडमीच्या यूपीएससी निकालातील यशवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ढाकणे बोलत होते. 

यूपीएससीमध्ये मराठी मुलांचे प्रमाण वाढावे यासाठी द युनिक अकॅडमी सुरूवातीपासून प्रयत्न करीत आहे. परिक्षेच्या गरजा ओळखून केले जाणारे मार्गदर्शन आणि दर्जेदार संदर्भसाहित्य यामुळे विद्यार्थ्यांचे यश सुकर होत असल्याचे सांगत ढाकणे यांनी द युनिक अकॅडमीचे अभिनंदन केले.

२०२२ च्या युपीएससी निकालात द युनिक अकॅडमीमधून मार्गदर्शन घेतलेल्या ४५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांचा सत्कार व अनुभवकथन कार्यक्रम पार पडला. 'युनिक'चे संचालक तुकाराम जाधव यांनी प्रास्ताविकात सत्कार समारंभामागची भूमिका विषद केली.  यावेळी युनिक अकॅडमीने प्रकाशित केलेल्या एनसीईआरटी आधारित पुस्तक मालिका, पॉलिटिकल सायन्स थ्रू क्वेशन्च्स अँड आन्सर्स तसेच अँथ्रोपॉलॉजी सिम्प्लिफाइड व पंतप्रधान पीक विमा योजना – महाराष्ट्र एक मूल्यमापन या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यूपीएससी आणि वर्णनात्मक एमपीएससी मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तके उपयुक्त ठरतील, असा विश्वास तुकाराम जाधव यांनी व्यक्त केला.

या वेळी यशवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या कुटुंबियांसमवेत सत्कार करण्यात आला. यशवंत विद्यार्थ्यांनी युपीएससी तयारीची प्रक्रिया विषद करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वसंत दाभोलकर, जैनम जैन, प्रतिक जराड, सोहम मांढरे, शृतिषा पठाडे, मंगेश खिलारी, ओमकार गुंडे, सागर खर्डे, मोहम्मद हुसेन, राजश्री देशमुख, अक्षय नेर्ले, सागर देठे, आदित्य पाटील, तुषार पवार या यशवंतांनी सत्काराला उत्तर देत मनोगत व्यक्त केले. महेश शिरापूरकर यांनी सूत्रसंचालन केले, तर भारत पाटील यांनी आभार मानले.

Share this story

Latest