संग्रहित छायाचित्र
बऱ्याचदा आपल्या लाडक्या मुलांच्या हट्टापाई पालक अल्पवयीन मुलांना अगदी महागड्या रेसर गाड्यांची खरेदी करून देतात. अल्पवयीन मुले गाड्या बेजबाबदारपणे चालवून शहरात अनेक गंभीर अपघाताच्या घडना घडून आल्याचे दिसून आले आहे. म्हणून पुणे प्रादेशिक परिवहन खात्याच्यावतीने अल्पवयीनचालकांविरोधी कडक तपासणी मोहिम राबिण्यात येत आहे. या तपासणीदरम्यान वाहनचालक अल्पवयीन असल्याचे आढळून आल्यास संबंधितांच्या पालकांना तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा २५ हजार रुपयांचा दंड, अशी कारवाईचा करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.
शहराच्या प्रमुख ठिकाणी आणि विशेषत: शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात १८ वर्षांखालील मुलांकडून ‘५० सीसी’पेक्षा अधिक क्षमतेच्या दुचाकी चालविणे, दुचाकीवर तीन प्रवासी, वेगात वाहन चालविणे, कर्कश ‘हॉर्न’वाजविण्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे अपघात घडण्याची शक्यता वाढते. या पार्श्वभूमीवर ‘आरटीओ’कडून तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
शहरातील दुचाकीचालकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहतूकीचे नियम न पाळल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच शाळा महाविद्यालयाच्या आवारात १८ वर्षांखालील मुले दुचाकी चालविणे आणि वाहतूकीचे नियम पाळत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे इतरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विविध भागातून तक्रारी वाढल्याने पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाईची मोहिम सुरु केली आहे. असे ‘आरटीओ’चे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली.
सार्वजनिक ठिकाणी ‘५० सीसी’पेक्षा अधिकला बंदी
मोटार वाहन कायदा १९८८ व केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार १८ वर्षांखालील वाहनचालक आढळून आल्यास वाहनाच्या मालकास शिक्षेची तरतूद आहे. सार्वजनिक ठिकाणी ‘५० सीसी’पेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालविणाऱ्या व्यक्तीस व कलम १८ अन्वये सार्वजनिक ठिकाणी १८ वर्षांखालील व्यक्तीस व्यावसायिक वाहन चालविण्यास मान्यता नाही. असे वाहनचालक आढळून आल्यास वाहनाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच, आई वडिलांना देखील शिक्षेची तरतूद असल्याने तीन वर्षांचा कारावास किंवा २५ हजारांचा दंड भरावा लागणार आहे.
पालकांडून १८ वया पेक्षा कमी असलेल्या आपल्या पाल्यांना शाळा, महाविद्यालयात जाण्याासाठी दुचाकी दिली जात आहे. अशा अल्पवयीनांकडून वाहतुकीचे नियम मोडले जात आहेत. यामुळे अपघात वाढत आहेत. तसेच वाहनाचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारामध्ये मुलींचाही समावेश असल्याचे दिसून येते. वाहतुकीस अडथळा निर्माण होणे, अपघातासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने अल्पवयीन वाहनचालकांबाबत तपासणी सुरू करण्यात येणार आहे.
- स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.