'ऑप्ट आउट' करून इतर गुणवंतांना संधी देणाऱ्या 'संवेदनशील' अधिकाऱ्यांचा सकल एमपीएससी विद्यार्थांच्या वतीने सन्मान

एमपीएससीमधून एकापेक्षा अधिक पदांसाठी निवड झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी कोणतेही एकच पद निवडून बाकीच्या पदांसाठी ऑप्ट आउट (Opt Out) करून सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील इतर गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना निवडीची संधी दिली.

'ऑप्ट आउट' करून इतर गुणवंतांना संधी देणाऱ्या 'संवेदनशील' अधिकाऱ्यांचा सकल एमपीएससी विद्यार्थांच्या वतीने सन्मान

एमपीएससीमधून (MPSC) एकापेक्षा अधिक पदांसाठी निवड झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी कोणतेही एकच पद निवडून बाकीच्या पदांसाठी ऑप्ट आउट (Opt Out) करून सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील इतर गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना निवडीची संधी दिली. त्यामुळे  सकल एमपीएससी विद्यार्थांच्या वतीने आणि 'एमपीएससी मेड सिम्पल'(MPSC Made Simple) चे प्रमुख अॅड. डॉ. अजित काकडे यांच्या पुढाकाराने अशा आदर्श विद्यार्थ्यांच्या सन्मान करण्यासाठी "सन्मान संवेदनशील गुणवंतांचा - सोहळा कृतज्ञतेचा" या सोहळ्याचे रविवारी (दि.21) केसरी वाडा येथे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथि म्हणून लोहपुरुष स्पर्धा विजेता डॉ.राहुल र. पाटील (I.R.A.S), प्रसाद चौघुले, उपजिल्हाधिकारी पुणे, गोविंद दिगंबर काकडे (API मुंबई पोलीस) या मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. अजित दिगंबर काकडे यांनी प्रास्ताविक करत ऑप्ट आउट बद्दलचे महत्त्व सांगत लोकसेवा आयोगाचे या 'प्रोसेस' बद्दल आभार मानले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ऑप्ट आउट करणाऱ्या ४७ संवेदनशील गुणवंतांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. तसेच सर्वांनी उभे राहून सुमारे पाच मिनिटे टाळ्यांच्या गजरात संवेदनशील अधिकाऱ्यांचे आभार मानले. यानंतर निवड अधिकाऱ्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व अनुभव कथन केले.

कार्यक्रमासाठी 320 विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. अनिता काकडे यांनी केले. तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. ऑप्ट आउट  करून इतर गुणवंत विद्यार्थ्यांना संधी देणाऱ्या संवेदनशील विद्यार्थ्यांचा यथोचित मानसन्मान केल्याबद्दल 'एमपीएससी मेड सिम्पल'चे प्रमुख डॉ. अजित काकडे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest