धानोरी जकात नाका रोडवरील खड्डे तात्काळ दुरुस्त करा
पुण्यातील धानोरी जकात नाका रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पक्षाचे पुणे शहर मीडिया प्रमुख अमित म्हस्के यांच्या नेतृत्वात आज आंदोनल करण्यात आले. धानोरी येथे खड्ड्यामध्ये प्रतिकात्मक बोट सोडून व झाडे लाऊन महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला आहे.
धानोरीतील जकात नाका रस्स्त्यावर अनेक दिवसांपासून याठिकाणी मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. परंतु प्रशासनाचे दुर्लक्ष याठिकाणी केले जाते. या ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहतुकीची समस्या उद्भवत आहे. कोणत्याही उपाययोजना नागरिकांना केलेल्या दिसत नाही. पुणे महापालिकेच्या या ठिकांहून १५० कोटी रुपये टॅक्स स्वरूपात दरवर्षी मिळतात. पण त्या प्रमाणात प्रशासनाकडून कोणतीही सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. धानोरी या ठिकांचे डी. पी रोड अनेक वर्षांपासून केले जात नाही. यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे, असे यावेळी बोलताना म्हस्के यांनी सांगितले.
प्रशासनाने त्वरित यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. या आंदोलनात आम आदमी पार्टीचे अविनाश भाकरे, मनोज शेट्टी, श्रद्धा शेट्टी, सुरज बिराजदार, अक्षय म्हस्के,संजय कोणे, शिवाजी डोलारे, संजय कटारणवरे, अक्षय दावडिकर, जोगिंदर पाल तुरा, मिलिंद ओव्हाळ, मंजुनाथ मनुरे, संदीप सुर्यवंशी, गणेश तरलेकर उपस्थित होते.