संग्रहित छायाचित्र
लोकअदालतीमध्ये एका अपघातग्रस्त कुटुंबाला न्यायालयाने दिलासा दिला आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अपघातात प्राण गमवाव्या लागलेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबाला दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीसाठी सव्वा कोटी रुपये तर, जखमी झालेल्या मुलाला ७५ लाखांची नुकसान भरपाई देण्यात आली. हा दावा लोकअदालतीमध्ये दावा तडजोडीत निकाली काढण्यात आला. हा अपघात जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर घडला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई महामार्गावर असलेल्या वडगाव फाटा येथे २६ फेब्रुवारी २०२१ रोजी हा अपघात घडला होता. एका भरधाव मोटारीने दुचाकीस्वाराला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार प्रवीण धेंडे (वय ४९) यांचा मृत्यू झाला होता. तर, त्यांच्यासह प्रवास करणारे अभिषेक प्रवीण धेंडे (वय २४) हे डोक्याला गंभीर मार लागल्याने गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात मोटारचालकाला झाली होती. याप्रकरणी न्यायालायत आरोपपत्रदेखील दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. प्रवीण धेंडे हे एका रायासनिक कारखान्यात वरिष्ठ तांत्रिक व्यवस्थापक पदावर काम करीत होते. तर, त्यांचा जखमी मुलगा अभिषेक अभियांत्रिकी शाखेत प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. अपघातात कुटुंबातील कर्ता गेल्याने प्रवीण धेंडे यांची पत्नी, आई, तसेच अभिषेकच्या भावाने मोटार अपघात न्यायाधिकरणात दावा दाखल केला होता.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या अभिषेकने नुकसान भरपाईसाठी मोटार अपघात न्यायाधिकरणात स्वतंत्र दावा दाखल केला. धेंडे कुटुंबीयांकडून ॲड. भास्कर सूर्यवंशी यांनी बाजू मांडली. हा दावा लोकअदालतीत तडजोडीत निकाली काढण्यासाठी मोटार विमा कंपनीने सहमती दर्शविली होती. त्याला धेंडे कुटुंबीयांनी देखील सहमती दर्शविली होती. संबंधित विमा कंपनी आणि धेंडे कुटुंबियांमध्ये लोकअदालतीत तडजोड करण्यात आली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.