मृतदेह ताब्यात मिळावा म्हणून जहांगीर रुग्णालयासमोर नातेवाईकांचे उपोषण
पुणे – जहांगीर हॉस्पिटलमध्ये एका ३५ वर्षीय गृहिणीचे निधन झाले. सकाळी ८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता तिचा मृत्यू झाला. मात्र हॉस्पिटलने बिल भरले नाही म्हणून मृतदेह ताब्यात दिला नाही. या अत्यंत संवेदनशील आणि संतापदायक बाबीचा निषेध करण्यासाठी मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलच्या गेट समोर उपोषण सुरू केले आहे.
विशेष म्हणजे, या ३५ वर्षीय तरुणीचे किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन यशस्वी होईल असे आत्मविश्वासपूर्वक हॉस्पिटलने महिलेच्या कुटुंबीयांना सांगितले होते. यावर विश्वास ठेवून तिच्या कुटुंबीयांनी गेल्या वर्षभरात जहांगीर हॉस्पिटलमध्ये ५२ लाख रुपयांपर्यंत खर्च केले आहेत. आता मृतदेह मिळवण्यासाठी त्यांना उपोषणाची मार्ग पत्करावा लागत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.