पुणे : पादचाऱ्यांचे फोन पळवणाऱ्या तिघांना पोलिसांनी केले जेरबंद

रात्रीच्या वेळी पायी चालणाऱ्या नागरिकांचे मोबाईल फोन आणि मंगळसुत्र हिसकावणाऱ्या टोळीचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन जणांना पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मोबाईल फोन आणि दुचाकीसह एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Wed, 10 May 2023
  • 01:25 pm
Arrested : पादचाऱ्यांचे फोन पळवणाऱ्या तिघांना पोलिसांनी केले जेरबंद

Arrested : पादचाऱ्यांचे फोन पळवणाऱ्या तिघांना पोलिसांनी केले जेरबंद

रात्रीच्या वेळी चोरटे पादचाऱ्यांचे पळवायचे फोन

रात्रीच्या वेळी पायी चालणाऱ्या नागरिकांचे मोबाईल फोन आणि मंगळसुत्र हिसकावणाऱ्या टोळीचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन जणांना पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मोबाईल फोन आणि दुचाकीसह एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

निखिल गोपाळ साळुंखे (वय २०), अथर्व अमर अवघडे (वय १९) आणि प्रदीप कांबळे (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. रात्रीच्या वेळेस जेवण झाल्यावर पायी चालणाऱ्या नागरिकांचे मोबाईल चोरीला जात असल्याची तक्रार अनेकदा नागरिकांनी पोलिसांकडे केली होती. त्यानुसार पोलिसांनी देखील कारवाई करण्यास सुरुवात केली. मोबाईल, मंगळसूत्र व पैसे अशा गोष्टी रात्रीच्या वेळेस हिसकवणारी टोळी फिरत असल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी याबाबत एक सापळा रचला होता.

यासंदर्भात तपास सुरू असताना गोपनीय माहिती दाराकडून पोलिसांना अशी माहिती मिळाली की रात्रीच्या वेळात मोबाईल दिसणारे हे चोर चोरीचे मोबाईल विकण्यासाठी गंजपेठ महात्मा फुलेवाडा जवळ येणार आहेत. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून यामधील तीनही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे तीन चोरीचे मोबाईल पोलिसांना मिळाले आहेत. या सोबतच चोरीच्या वेळी वापरली गेलेली दुचाकी असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यातील आरोपी प्रीतम कांबळे याच्यावर मारामारी व खुणाचा प्रयत्न अशा प्रकारचे गंभीर गुन्हे फरासखाना व खडक पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest