PUNE: एम्प्रेस गार्डनची तब्बल १८.२७ कोटी रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी

पुणे: कॅन्टोन्मेंट बोर्डाने (Pune Cantonment Board) शनिवारी (दि. २७) एम्प्रेस गार्डन व्यवस्थापनाला नोटीस दिली. २००६ च्या कॅन्टोन्मेंटच्या कायद्यानुसार वार्षिक दराच्या मूल्यावर आधारित गणना करून व्यवस्थापनाला नोटीस बजाविण्यात आली आहे.

Empress Garden

संग्रहित छायाचित्र

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची नोटिस, कडक कारवाईचा इशारा

पुणे: कॅन्टोन्मेंट बोर्डाने (Pune Cantonment Board) शनिवारी (दि. २७) एम्प्रेस गार्डन व्यवस्थापनाला नोटीस दिली. २००६ च्या कॅन्टोन्मेंटच्या कायद्यानुसार वार्षिक दराच्या मूल्यावर आधारित गणना करून व्यवस्थापनाला नोटीस बजाविण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षात एम्प्रेस गार्डन (Empress Garden) व्यवस्थापनाने एकदाही मालमत्ता कर भरला नसल्याचे समोर आले आहे. या नोटिशीनुसार व्यवस्थापनाला तब्बल १८.२७ कोटी रुपये भरावे लागणार आहेत. बोर्डाने पाठविलेल्या नोटिशीला उत्तर पाठवावे लागणार आहे. या उत्तरातून बोर्डाने समाधान न झाल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. (Latest News Pune)

याविषयी ‘सीविक मिरर’ला माहिती देताना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रत पाल म्हणाले, ‘‘बोर्ड प्रशासनाने एम्प्रेस गार्डन व्यवस्थापनाला नोटीस बजावली आहे, त्यांना बोर्डाकडे असलेल्या मालमत्ताकराची थकबाकी तातडीने भरण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. थकबाकी भरण्यास व्यवस्थापनाने असमर्थता दर्शविल्यास किंवा समाधानकारक उत्तर न दिल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.’’

दुसरीकडे, मालमत्ताकराची थकबाकी भरण्याबाबत पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून नोटीसच  मिळाली नसल्याचा दावा एम्प्रेस गार्डन व्यवस्थापनाकडून करण्यात आला आहे. ‘‘पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने नोटीस दिल्याची माहिती नाही. अद्याप आमच्याकडे कोणत्याही प्रकारची नोटीस प्राप्त झालेली नाही,’’ असे ‘सीवक मिरर’ला सांगत याबाबत बोलण्यास गार्डनचे व्यावस्थापक प्रशांत चव्हाण यांनी नकार दिला.

पुणे रेसकोर्सजवळ तब्बल ४० एकर जागेत वसलेले एम्प्रेस गार्डन हे बोटॅनिकल गार्डन म्हणूनदेखील ओळखले जाते. वेस्टर्न इंडियाच्या ॲग्री-हॉर्टिकल्चरल सोसायटीच्या अंतर्गत हे गार्डन चालवले जाते. एम्प्रेस गार्डनला ऐतिहासिक वारसा असून १८३० मध्ये बॉम्बे राज्याचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉन माल्कम यांनी ॲग्री-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाच्या माध्यमातून त्याची स्थापना केली होती. 

वर्षानुवर्षे, वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. बर्डवूड, डॉ. हेडल, डॉ. जगन्नाथ शंकरसेठ, डेव्हिड ससून, जमशेदजी जिजाभॉय आणि इतर यांच्यासारख्या प्रमुख व्यक्तींनी त्याचे पालनपोषण केले आहे. मानद सचिव म्हणून प्रख्यात रोझरियन सुरेश पिंगळे आणि मानद खजिनदार म्हणून डॉ. फिरोज पूनावाला यांचा या ट्रस्टमध्ये समावेश आहे. 

पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ, अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर, वनस्पतिशास्त्रज्ञ प्रा. एस. डी. महाजन, पर्यावरणतज्ज्ञ सुमनताई किर्लोस्कर, महापालिकेचे माजी उद्यान अधीक्षक यशवंत खैरे आदींनी या गार्डनला पाठिंबा दिला आहे.

मालमत्ताकराशी संबंधित बाबी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारत कक्षाच्या अखत्यारित येतात. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने दिलेल्या नोटिशीबद्दल आम्हाला कोणतीही कल्पना नाही.

-  सुरेश पिंगळे, मानद सचिव, वेस्टर्न इंडियाच्या ॲग्री-हॉर्टिकल्चरल सोसायटी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest