bicycle pune metro
पुणे : पुणे मेट्रो आणि त्यामधील करामती सर्वांनाच माहिती आहेत. त्यात पुणे मेट्रोने मेट्रोतून सायकल ने-आण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र आता या सायकल ने-आण करणाऱ्यासाठी मेट्रोने काही नियम लागू केले आहे. पुणे मेट्रोने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
पुणे मेट्रोने ट्वीटमध्ये नेमकं काय दिलं...
''नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे, ज्यामध्ये एक तरुण सायकल घेऊन मेट्रोतून प्रवास करताना दिसत आहे. तर पुणे मेट्रो आपणास सांगू इच्छितो की, मेट्रो मध्ये सायकल घेऊन जाण्याची मुभा पुणे मेट्रोने दिलेली आहे. मेट्रो मध्ये सायकल घेऊन जाताना प्रवाश्यानी सायकल हातात घेऊन जावी, सायकलवर बसुन जाणे नियमांच्या विरुद्ध आहे. सायकलचा इतर प्रवाश्यांना कोणताही अडथळा होणार नाही याची काळजी त्या प्रवाश्याने घेणे आवश्यक आहे. स्थानकावर आणि फलाटावर सायकल चालवणे व त्यामुळे इतर प्रवाश्यांना त्रास होईल असे वागणे पुणे मेट्रोच्या नियमानुसार कारवाई करण्यास पात्र असेल. त्यामुळे नागरिकांनी अश्या प्रकारे स्टंट व प्रवास करणे टाळावे असे आवाहन पुणे मेट्रो सर्व प्रवाश्यांना करीत आहे.''
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.