Old Mumbai-Pune highway : बोपोडीतील अनाधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेची धडक कारवाई

जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या रस्ता रूंदीकरणासाठी पुणे महापालिकेने अनाधिकृत बांधकामावर धडक कारवाई केली आहे. ही कारवाई बोपोडी येथे गुरूवारी (दि. २५) सकाळी ८ वाजेपासून संध्याकाळी ८ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. यात एकूण ६३ मालमत्ता ताब्यात घेवून जमीनदोस्त करण्यात आल्या. एकूण ४९७९ चौरस मीटर क्षेत्रफळावर ही भूसंपादन कारवाई करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 26 May 2023
  • 11:50 am
बोपोडीतील अनाधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेची धडक कारवाई

बोपोडीतील अनाधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेची धडक कारवाई

जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणासाठी केली कारवाई

जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या (Old Mumbai-Pune highway)रस्ता रूंदीकरणासाठी पुणे महापालिकेने (PMC) अनाधिकृत बांधकामावर धडक कारवाई केली आहे. ही कारवाई बोपोडी येथे गुरूवारी (दि. २५) सकाळी ८ वाजेपासून संध्याकाळी ८ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. यात एकूण ६३ मालमत्ता ताब्यात घेवून जमीनदोस्त करण्यात आल्या. एकूण ४९७९ चौरस मीटर क्षेत्रफळावर ही भूसंपादन (unauthorized) कारवाई करण्यात आली आहे.

यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे आणि पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, महापालिका उपायुक्त प्रतिभा पाटील, उपायुक्त महेश पाटील, सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे, विशेष भूसंपादन अधिकारी शेंडगे, नगरनियोजनच्या सहायक शीतल भिंगारदिवे, औंध क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्त संदीप खलाटे, कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे, उपअभियंता प्रशांत महिंद्रकर, तसेच अतिक्रमण विभागातील अधिकारी ५० अधिकारी, ७५ मजूरांसह सुमारे ४५० पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.

२०१८ मध्ये या ठिकाणचे रस्ता रुंदीकरण करण्यात येणार होते. मात्र, या प्रकरणी महापालिकेच्या विरुद्ध दावे केले गेल्यामुळे २०१८ पासून ही कारवाई प्रलंबित होती. अखेरच ४ प्रकरणांमध्ये महापालिकेच्या विरूध्द केल्या गेलेल्या दावांचा निकाल महापालिकेच्या बाजूने लागला आहे. त्यानंतर अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. लवकरच या ठिकाणी रस्त्याचे काम करण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest