संग्रहित
पुण्यात आयटी कंपनीत एका तरुणीवर धारदार शस्त्राने वार करत सहकाऱ्यानेच खून केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही बिझनेस प्रोसेस आउसोर्सिंग कंपनी काम करत होते. किरकोळ वादावरुन तिच्याच सहकाऱ्याने मंगळवारी संध्याकाळी तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचे नाव शुभदा कोदरे असं आहे. तर सहकाऱ्याचे नाव कृष्ण कनोजा असं आहे. दोघेही फर्म अकाउंट्स विभागात एकत्र काम करत होते. . शहरातील येरवडा भागात असलेल्या WNS या कंपनीच्या पार्किंगमध्ये हा हल्ला झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
पर पोलीस आयुक्त मनोज पाटील म्हणाले, 'प्राथमिक माहितीनुसार, संशयिताने कोदारे यांच्यावर कंपनीच्या पार्किंगमध्ये संध्याकाळी सहाच्या सुमारास तरूणीवर धारदार शस्त्राने वार केले. उधार पैसे देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती मिळाली. हल्ला झाला तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला.
आरोपी कृष्णा कनोज या पोलिसांनी ताब्यात घेतलं असुन पुढील तपास सुरु असल्याचे सांगितले. मृत तरूणीच्या बहिणीच्या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता (BNS) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.