पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर उद्या ब्लॉक
पुणे : पुणेकरांसाठी(Pune) महत्वाची बातमी समोर आली आहे. उद्या म्हणजेच सोमवारी (दि. १६) तुम्ही पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाने (Pune-Mumbai Expressway) मुंबईला जाण्याचा विचार करत असाल तर थांबा. उद्या दुपारी १२.०० ते दुपारी १.०० या कालावधीत पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबई-पुणे या लेनवर ब्लॉक (Block) घेण्यात येणार आहे. मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर पुणे वाहिनीवर आडोशी येथे हायवे ट्रॉफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी हा ब्लॉक ठेवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्या सोमवार (दि.१६) रोजी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर पुणे वाहिनीवर आडोशी येथे हायवे ट्रॉफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. आयटीएमएस प्रकल्पांतर्गत पुणे लेनवर बोरघाट हद्दीत किलोमीटर 40/100 आणि किलोमीटर 45/900 या ठिकाणी गॅन्ट्री बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी १२.०० ते दुपारी १.०० या वेळेत पूर्णत: बंद राहणार आहे. सदर काम पुर्ण झाल्यावर पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.
जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल
मावळ तालुक्यातील वेहेरगांव, कार्ला येथील श्री एकविरा देवीच्या मंदिर परिसरात १५ ऑक्टोबर पासून नवरात्रोत्सव यात्रा सुरु होत असल्याने यात्रा कालावधीत वाहतुक कोंडी होऊ नये व कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून जड, अवजड वाहतूकीसाठी पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.
मौजे वेहेरगांव, कार्ला येथे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून कार्ला फाटा ते श्री एकविरा देवी पायथा मंदिर दरम्यान १५ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत पूर्ण वेळ जड व अवजड वाहनांना प्रवेश बंद राहील. २१ ते २३ ऑक्टोबर या ३ दिवसाच्या कालावधीत सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत जुन्या मुंबई पुणे महामार्गावर लोणावळा-कुसगांव बुद्रुक टोलनाका - वडगांव फाटामार्गे पुणे बाजूकडे जाणारी जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करुन ती खंडाळा - कुसगांव टोलनाका मार्गे नवीन द्रुतगती मार्गावरुन पुणे बाजूकडे जातील.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.