संग्रहित छायाचित्र
पुण्याचा युवा कथ्थक नर्तक मल्लिकार्जुन कार्लेकर याला केंद्र सरकारच्या ‘सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अॅण्ड ट्रेनिंग’ची (सीसीआरटी) शिष्यवृत्ती मिळाली आहे.
मल्लिकार्जुन गेली आठ वर्षे गुरू आस्था कार्लेकर यांच्याकडे कथ्थक नृत्याचे थडे घेत आहे. त्याने श्रीकालहस्ती (आंध्र प्रदेश), पारनेर, इंदूर, हैदराबाद, पुणे आदी ठिकाणी आयोजित विविध महोत्सवांत नृत्य सादर केले आहे.
‘तमिळ संगम, पुणे’ या संस्थेतर्फे आयोजित एकल कथ्थक नृत्यस्पर्धेत त्याने ‘ब्रिलियंट कथ्थक डान्सर’ पुरस्कार मिळवला आहे. तसेच, ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठा’तर्फे आयोजित कथ्थक नृत्यस्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तो शनिवार पेठेतील न्यू इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आठवीत शिकत आहे.