'नो वॉटर... नो वोट' पुण्यात झळकले बॅनर्स; बॅनर्समुळे राजकीय चर्चांना उधाण
मागील अनेक वर्षांपासून शिवाजीनगर परिसरातील पाणी प्रश्न गंभीर बनलेला आहे. अनेकदा मागणी करूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. आपला संताप शिवाजी नगर च्या रहिवाशांनी या बनर्सद्वारे व्यक्त केला आहे. 'नो वॉटर... नो वोट' (No Water... No Vote)असे फलक सेंट्रो मॉलजवळ लावण्यात आले आहेत. या बॅनर्समुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
पुण्यातील शिवाजीनगर परििसरात हे बॅनर्स लागले आहे. शहरासह शिवाजीनगर परिसरात पाण्याचा प्रश्न सद्या गंभीर बनला आहे. या भागातील नागरिकांनी अनेकदा पाण्याची मागणी करून सुद्धा त्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची या भागातील नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे हा संताप व्यक्त करण्यासाठी शिवाजीनगर परिसरातील रहिवाशांनी बॅनर्स लावत आपला संताप व्यक्त केला. 'नो वॉटर... नो वोट' अशा आशयाचे फलक सेंट्रो मॉलजवळ लावण्यात आले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.