पुणे: 'एन. एस. हेल्थकेअर सर्व्हिसेस पॅथॉलॉजी लॅब'ला एक लाखाचा दंड; सीरिंज आणि रक्ताचे नमुने कात्रज घाटात उघड्यावर दिले होते फेकून

सीरिंज आणि रक्ताचे नमुने असलेल्या शेकडो बाटल्या बेजबाबदारपणे कात्रज घाटात फेकून देणे एका पॅथाॅलाॅजी लॅबला चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी बालाजीनगर येथील एन. एस. हेल्थकेअर सर्व्हिसेस पॅथॉलॉजी लॅबकडून एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सीरिंज आणि रक्ताचे नमुने कात्रज घाटात उघड्यावर दिले होते फेकून

सीरिंज आणि रक्ताचे नमुने असलेल्या शेकडो बाटल्या बेजबाबदारपणे कात्रज घाटात फेकून देणे एका पॅथाॅलाॅजी लॅबला चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी बालाजीनगर येथील एन. एस. हेल्थकेअर सर्व्हिसेस पॅथॉलॉजी लॅबकडून (N. S. Healthcare Services Pathology Lab, Balajinagar) एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पॅथॉलॉजी लॅबमध्ये वापरण्यात आलेली सीरिंज आणि रक्ताचे नमुने असलेल्या शेकडो बाटल्यांची तीन पोती कात्रजच्या घाटात आढळून आल्याने प्राणी आणि पक्षीमित्रांनी संताप व्यस्त केला होता. त्यांनी याप्रकरणी पुणे महापालिकेच्या (PMC) घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर विभागातील अधिकाऱ्यांनी घाटात जाऊन पाहणी केल्यानंतर ही पोती के. के. मार्केट बालाजीनगर येथील एन. एस. हेल्थकेअर सर्व्हिसेस पॅथॉलॉजी लॅबने फेकली असल्याचे समोर आले.  हे स्पष्ट झाल्यावर घनकचरा व्यवस्थापन विभागा संबंधित लॅबकडून एक लाख रुपये दंड वसूल केला.  

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दररोज बायोमेडिकल वेस्ट (Biomedical Waste) शहरातून गोळा केले जाते. त्यामुळे हे वेस्ट उघड्यावर टाकू नये, असे आवाहन महापालिकेकडून वारंवार केले जाते. हे बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकल्याने नागरिकांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. तसेच आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे महापालिकेकडून बायोमेडिकल वेस्ट गोळा करण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र असे असतानादेखील पॅथॉलॉजी लॅबमध्ये वापरण्यात आलेली सीरिंज आणि रक्ताचे नमुने असलेल्या शेकडो बाटल्यांची तीन पोती कात्रजच्या घाटात फेकल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. २६)  उघडकीस आला.

बायोमेडिकल वेस्ट  धोकादायक असल्याने सार्वजनिक ठिकाणी फेकण्यास मनाई करण्यात आलेली असताना कात्रज घाटात आढळल्याने पक्षीप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. तसेच बायोमेडिकल वेस्ट धोकादायक आहे, हे माहिती असूनही सार्वजनिक ठिकाणी फेकल्याने संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी आरोग्य निरीक्षकांना कारवाईचे आदेश दिले होते.

त्यानुसार साहाय्यक आयुक्त धनकवडी, सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय साहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम  व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विक्रम काथवटे यांनी जुना कात्रज घाटात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या लॅबचा शोध घेण्यात आला. यात हेल्थकेअर सर्व्हिसेस या लॅब हे बायोमेडिकल वेस्ट टाकल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे लॅबवर एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आणि तो वसूलही करण्यात आला. तसेच पुन्हा बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर न टाकण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली आहे. पडलेला बायोमेडिकल वेस्ट गोळा करून घेण्यात आला आहे.  तसेच तो बायोमेडिकल वेस्ट वाहतूक करणाऱ्या कंपनीकडे सुपूर्द केला.

प्राणिमित्र बाळासाहेब ढमाले यांना शुक्रवारी सकाळी कात्रज घाटात रस्त्याच्या कडेला बायोमेडिकल वेस्ट फेकल्याची माहिती मिळाली. त्यांनी जाऊन पाहणी केली असता, घाटात तीन पोती भरून सीरिंज आणि रक्ताचे नमुने असलेल्या बाटल्या आढळून आल्या. एका पोत्यातून शेकडो बाटल्या रस्त्याच्या कडेला पडल्याने ढिगारा झाल्याचे दिसून आले. अन्य दोन मोठी पोती भरून साहित्य तिथे ठेवण्यात आल्याचे दिसून आले होते.

कात्रज घाटात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर आहे. या रक्ताच्या बाटल्या, प्रयोगशाळेतून बाहेर आल्या असल्याने त्यांचा पर्यावरणाला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. डोंगर उतारावरून त्या खाली गेल्यास, फुटून वन्यप्राण्यांना आणि पक्ष्यांना संसर्ग होऊ शकतो. वैद्यकीय कचरा माणसासाठीही धोकादायक आहे. अशी माहिती देत महापालिकेने हा कचरा तातडीने उचलावा आणि तो फेकणाऱ्यांचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर करण्याची मागणी प्राणिमित्र ढमाले यांनी केली होती. त्याची तत्काळ दखल घेत घनकचरा व्यवस्थापन विभागाने ही कारवाई केली.

"प्राणीमित्रांनी महापालिकेकडे कात्रज घाटात बायोमेडिकल वेस्ट फेकल्याची तक्रार केली होती. प्रकाराचे गांभीर्य ओळखून तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले होते. बायोमेडिकल वेस्टमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. पुन्हा असे कृत्य केल्यास कडक कारवाई केली जाईल."
-  संदीप कदम, घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख, पुणे महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest