पुणे: ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह

पुणे: पोलीस विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी अमलदार यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्हाने सन्मानित करण्यात येते. हा बहुमान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत यांना मिळाला असून यांना पोलिस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे.

पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत

हे सन्मान चिन्ह त्यांना १ मे महाराष्ट्रदिनी प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. गुन्हेगारांविरुद्ध केलेल्या कारवाईसाठी आणि  खळबळजनक तसेच गंभीर गुन्ह्यांचा यशस्वीपणे तपास केल्याबद्दल त्यांना "DG INSIGNIA" पदक जाहीर केले आहे. हे सन्मानचिन्ह प्रवर्ग ३ मध्ये जाहीर करण्यात आले आहे. अभिजीत सावंत सध्या पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत असून ते २०१५ मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदावर पोलिस खात्यामध्ये भरती झाले. आत्तापर्यंत त्यांची पोलिस खात्यात ९ वर्ष सेवा पूर्ण झाली आहे. इतक्या कमी कालावधी  मध्ये त्यांनी सांगली व पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे  म्हणून त्यांना उत्कृष्ठ सेवेसाठी १५० बक्षिसे देखील मिळाली आहेत. (Pune Police News)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest