Pune Metro : नागरी वाहतूक परिषदेत 'पीएमआरडीए'चा बोलबाला, माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे सादरीकरण

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी विकास (Pune Metro) मंत्रालयामार्फत १६वी नागरी वाहतुक परिषद नवी दिल्ली (PMDRA) येथे २७ ते २९ ऑक्टोबर २०२३ रोजी पार पडली. या परिषदेमध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुख्य प्रायोजक (Pune News) म्हणून सहभाग घेतला होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Thu, 2 Nov 2023
  • 07:34 pm
Pune Metro : नागरी वाहतूक परिषदेत 'पीएमआरडीए'चा बोलबाला, माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे सादरीकरण

नागरी वाहतूक परिषदेत 'पीएमआरडीए'चा बोलबाला, माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे सादरीकरण

वाहतूक विषयांवरील सर्वंकष आराखडे सादर

पुणे : केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी विकास (Pune Metro) मंत्रालयामार्फत १६वी नागरी वाहतुक परिषद नवी दिल्ली (PMDRA) येथे २७ ते २९ ऑक्टोबर २०२३ रोजी पार पडली. या परिषदेमध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुख्य प्रायोजक (Pune News) म्हणून सहभाग घेतला होता. या परिषदेत माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प, पुणे, पिंपरी चिंचवड शहर (Man-Hinjawadi-Shivajinagar Metro) आणि लगतच्या ग्रामीण भागाकरिता आखण्यात आलेला सर्वंकष वाहतूक आराखडा (कॉम्प्रासिंव्ह मोबिलिटी प्लॅन) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामधील एकात्मीक दुमजली उड्डाणपुल या प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत २३.२०३ किलोमीटर लांबीचा माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याकरिता ८ हजार ३१३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुणे मेट्रो लाईन ३, माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर राबविण्यात येत आहे. त्यांच्या अंमलबजावणीकरिता राज्य शासनाने ०९ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली असून प्रकल्पाची अंमलबजावणी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमीटेड या  कंपनीमार्फत करण्यात येत आहे. प्रकल्पाचा सवलतकरारनामा २१ सप्टेंबर २०१९ रोजी करण्यात आला आहे. आजमितीस प्रकल्पाचे ४५ टक्के काम पुर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे हिंजवडी आयटी पार्क येथील कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रवासांमध्ये मोठा दिलास मिळणार आहे. त्यांची वाहतूक कोंडीमधून सुटका होणार आहे.

यासोबतच, प्राधिकरणामार्फत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात येणाऱ्या वाहतूकीचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने ६५ मीटर रुंदीच्या रिंगरोडचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. प्राधिकरणाने पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि लगतच्या ग्रामीण भागाकरिता सर्वंकष वाहतूक आराखडा (कॉम्प्रासिंव्ह मोबिलिटी प्लॅन) २०१८ मध्ये प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड आणि लगतच्या परिसरातील वाहतूकीचे प्रश्न सोडविण्याकरिता विविध उपाययोजनांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. तसेच, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडमध्ये (पीएमपीएमएल) प्राधिकरणामार्फत यावर्षी अंदाजे १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. प्राधिकरणामार्फत शहरी वाहतूकीचे नियोजन सुरळीतरित्या होण्याकरिता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामध्ये एकात्मीक दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या दुमजली उड्डाणपुलाच्या पहिल्या मजल्यावरून वाहने धावणार आहेत. तरदुसऱ्या मजल्यावरून मेट्रो मार्गिका धावणार आहे. यामुळे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. प्राधिकरणाच्या शहरी वाहतूक क्षेत्रात होत असलेल्या कामाची केंद्रीय पातळीवर दखल घेण्याच्या उद्देशाने प्राधिकरणामार्फत परिषदेमध्ये मुख्य प्रायोजक म्हणून सहभाग घेण्यात आला होता. प्राधिकरणाच्या मेट्रो प्रकल्पाची सविस्तर माहिती दिल्ली येथील संपन्न परिषदेमध्ये सादर करण्यात आली.

याबाबत माहिती देताना अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला म्हणाले, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुणे व परिसरातील वाहतूकीशी निगडित प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मेट्रो, रिंग रोड, एकात्मिक दुमजली उड्डाणपूल असे प्रकल्प हाती घेतले असून प्रदेशाच्या विकास आराखड्यामध्ये वाहतूकीबाबत विशेष नियोजन केले आहे. सदरील १६वी नागरी वाहतुक परिषदेमध्ये मुख्य प्रायोजक म्हणून सहभागी झाल्याने प्राधिकरणाचे कामकाज देश पातळीवर पोहोचविण्यास मदत होणार आहे.

तर, मुख्य अभियंता रिनाज पठाण म्हणाल्या, केंद्र शासनाच्या नवीन मेट्रो रेल धोरण, २०१७ अंतर्गत सार्वजनिक खाजगी भागीदारीवर पुणे मेट्रो मार्गिका ३ हा पहिला प्रकल्प आहे. प्रकल्प सुरु करण्यापूर्वी ९७ टक्के जागा भूसंपादन करणारा देशातील पहिला प्रकल्प आहे. प्रकल्पाचे ४५ टक्के काम पूर्ण झाले असून मार्च २०२५ पर्यंत ही मेट्रो पुणेकरांच्या सेवेत उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest