पादचारी दिनानिमित्ताने बुधवारी लक्ष्मी रस्त्यावरील पीएमपी बसच्या मार्गात बदल

पुणे : महानगरपालिकेकडून बुधवारी (दि.११) पादचारी दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे हा रस्ता बुधवारी वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी या रस्त्यावरुन धावणाऱ्यां पीएमपी बसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Avchite
  • Mon, 9 Dec 2024
  • 04:57 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे : महानगरपालिकेकडून बुधवारी (दि.११)  पादचारी दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे हा रस्ता बुधवारी वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.  परिणामी या रस्त्यावरुन धावणाऱ्यां पीएमपी बसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रोडवर (उंबऱ्या गणपती चौक ते गरूड गणपती चौक) वॉकिंग प्लाझा या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.  लक्ष्मी रस्त्यारवरून संचलनात असलेल्या बसेसच्या मार्गात बुधवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. अशी माहिती पीएमीपी प्रशासनाने दिली. 

असा असेल बदल.. 

१) बसमार्ग क्र. ५५, ५८, ५९ हे बस मार्ग शनिपारकडे येताना कुमठेकर रोड मार्गे नियमित मार्गाने व शनिपारकडून जाताना अ.ब.चौक, नारायण पेठ, अलका टॉकिज चौकातुन पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील.

२) बसमार्ग क्र. ५७ या मार्गावरील बसेस पुणे स्टेशनकडून जाताना बसमार्ग क्र. ९४ च्या मार्गाने नारायणपेठ मार्गे अलका टॉकिज चौक व पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील.

३) अटल पुण्यदशमचे बसमार्ग क्र. ७ व ९ तसेच बसमार्ग क्र. ८१, १४४, १४४अ, १४४क व २८३ या मार्गावरील बसेस पुणे स्टेशनकडे जाताना नियमित मार्गाने संचलनात राहतील. तसेच पुणे स्टेशनकडून येताना बसमार्ग क्र. ९४ च्या मार्गाने नारायणपेठ मार्गे अलका टॉकिज चौक व पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील.

४) बसमार्ग क्र. १७४ या मार्गावरील बसेस पुणे स्टेशनकडून एनडीए कडे जाताना सिटी पोस्ट पर्यंत नियमित मार्गाने व पुढे उजवीकडे वळून अ.ब.चौक च्या पुढे बसमार्ग क्र. ९४ च्या मार्गाने नारायणपेठ मार्गे अलका टॉकिज चौक व पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील. तसेच एनडीए कडून पुणे स्टेशनकडे येताना सदर मार्गावरील बसेस नियमित मार्गाने संचलनात राहतील.

५) बसमार्ग क्र. १९७ व २०२ या मार्गावरील बसेस हडपसरकडून कोथरूड डेपो/वारजे माळवाडीकडे जाताना सिटी पोस्ट पर्यंत नियमित मार्गाने व पुढे उजवीकडे वळून अ.ब.चौक च्या पुढे बसमार्ग क्र. ९४ च्या मार्गाने नारायणपेठ मार्गे अलका टॉकिज चौक व पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील. तसेच कोथरूड डेपो/वारजे माळवाडी कडून हडपसरकडे येताना सदर मार्गावरील बसेस नियमित मार्गाने संचलनात राहतील.

६) बसमार्ग क्र. ६८ या मार्गावरील बसेस अप्पर डेपो कडे जाताना नियमित मार्गाने व अप्पर डेपो कडून सुतारदरा कडे येताना टिळकरोड मार्गे संचलनात राहतील. सदर दिवशी वॉकिंग प्लाझा या उपक्रमाची सांगता झालेनंतर वरील सर्व मार्गावरील बसेस पूर्ववत मार्गाने संचलनात राहतील.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest