'पीएमपीएमएल'ची ब्रेक डाऊन सर्व्हिस डाऊन, टोईंग व्हॅनने घेतला पेट
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात 'पीएमपीएमएमएल'च्या बस (PMPML) बंद पडल्यानंतर त्यांना घेऊन जाणारी बसच मंगळवारी 'डाऊन' झाली. (Fire News) नाना पेठेतील (Pune News) संत कबीर चौकामध्ये ही बस सुरुवातीला बंद पडली. त्यानंतर कर्मचारी ही बस ढकलत निघाले होते. त्यावेळी बसमधून अचानक धूर येऊ लागला.
या बसने पेट घेतला. ही घटना सामाजिक कार्यकर्ते अमोल तुजारे यांनी पाहिली. त्यांनी अग्निशामक दल आणि पोलिसांना याची माहिती दिली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग विझवली. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला त्यांना आंदोलनाचा प्रकार वाटला. मात्र, नागरिकांनी आणि पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना ही घटना तांत्रिक बिघाडामुळे घडल्याचे स्पष्ट केले. या घटनेत कोणीही जखमी नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.