पुणे : कै. शिवशंकर पोटे दवाखान्याचे नूतनीकरण व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेले डॉ. कदम डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून अल्पदरात आरोग्य सेवा पुरविणे, महा ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून सरकारी दाखल्यांचे विनामूल्य वाटप, आंबील ओढ्यासंदर्भात सतत सुरू असलेला पाठपुरावा व अन्य सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत आहे. नागरिकांचे शासकीय तसेच इतर प्रश्न मार्गी लावण्याकडे माझा कल राहिला आहे.
पर्वती विधानसभा मतदार संघातील जनतेचे अनेक प्रश्न दीर्घ काळापासून प्रलंबित आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधींनी ते प्रश्न अजूनही मार्गी लावलेले नाहीत, हेही मी जाणून आहे. जर तुम्ही मला संधी दिली, तर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन. पर्वतीमधील जनतेचे जीवन अधिक सुसह्य करण्यासाठी मी वचनबद्ध असेन, असा मी आपल्याला शब्द देते असे मत महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांनी प्रभाग क्रमांक ३० नवी पेठ या ठिकाणी आयोजित पदयात्रा दरम्यान व्यक्त केले.
शाहू वसाहत नवरात्र उत्सव पासून पदतीला सुरुवात करण्यात आली. मोरया मंडळ,आदर्श मंडळ हाउसिंग बोर्ड कॉलनी, रमणा गणपती मंदिर उजव्या बाजूने महात्मा फुले वसाहत, उमा माहेश्वर मंदिर,घोणे मटन शॉप समोरील चाळी ,भारत माता अभ्यासिका समोरील सोसायटी,पुणेकर बंगल्यापासून खाली पूरग्रस्त रहिवासी चाळ,बौद्ध विहार,पर्वती पोलीस स्टेशन,लक्ष्मी नगर रहिवासी संघ मंडळ,राजू फापाळे यांचे निवासस्थान,जय भवानी मंडळ मधील चाळी, पर्वती गाव आधार हॉस्पिटल, भागवत हॉल,शनी मंदिर फरीद पटेल यांचे निवासस्थान ,एस आर ए पर्वती गाव,औदुंबर सोसायटी शेलार वाडा, हरिविजय सोसायटी आदी भागातील नागरिकांशी संवाद आणि आपुलकीच्या गाठीभेटी झाल्या.यावेळी मोठ्या संख्येने महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. महिला आणि नागरिकांची संख्या पदयात्रे दरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करोनासारख्या जागतिक महामारीत स्वतःचे कुटुंब संकटात असतानाही न थांबता नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र झटणाऱ्या आणि कायम सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या आरोग्यसेविका अश्विनी नितीन कदम आहेत.
- सोनाली उजागरे
दिशा महिला बचत गट
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.