संग्रहित छायाचित्र
२०१९च्या पावसाळ्याने पुणेकरांच्या मनात भीतीचे घर केले. कारण मुसळधार पावसामुळे आंबिल ओढ्याला प्रचंड पूर आला आणि ओढ्याच्या पाण्याने अनेक सोसायट्यांमध्ये प्रवेश केला. सोसायट्यांच्या सिमाभिंती कोसळल्या, परिसरात खूप नुकसान झाले. पूर ओसरल्यानंतरही संभाव्य धोका कायमच होता, त्यामुळे नाल्यांच्या सीमाभिंती महत्वाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला.
महापालिकेने पूरप्रवण भागात काही ठिकाणी भिंती बांधल्या आणि पूरनियंत्रणासाठी पूलही उभारले. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे काही ठिकाणी हे काम अपूर्ण राहिले. याच मुद्द्यावर कोथरूडसह इतर पूरप्रवण नाल्यांना सीमाभिंत बांधण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी पाठपुरावा केला.
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर, चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नांनी या प्रश्नाला कायमस्वरूपी उत्तर मिळाले. २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून प्रकल्प मार्गी लावण्यात आला. नाल्याच्या पुरामुळे निर्माण होणारा धोका कमी झाला. पुणेकरांची दीर्घकाळची समस्या सोडवण्यात चंद्रकांतदादांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.