गुलटेकडी येथील नेहरू रस्त्यावर वाहनामधून ऑइलची गळती
पुण्यातील गुलटेकडी (Gultekdi) येथील नेहरू रस्त्यावर (Nehru Road) असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपुलावर वाहनामधून मोठ्या (Pune News) प्रमाणावर ऑइलची गळती झाली. त्यामुळे रस्ता निसरडा झाल्याने दुचाकी, चार चाकी वाहने घसरण्याच्या घटना घडल्या.
स्थानिक कार्यकर्ते गणेश शेरला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अग्निशामक दलाला या संदर्भात माहिती दिली. अग्निशामक दलाच्या मदतीने या रस्त्यावर माती टाकून थोड्या वेळा करता वाहतूक पुलाखालून वळवण्यात आली. ऑइल स्वच्छ केल्यानंतर या ठिकाणची वाहतूक हळूहळू पुरवत सुरू करण्यात आली. दरम्यान यामुळे या भागात वाहतूक कोंडी झाली होती. या पुलावर ऑईल सांडून किरकोळ अपघात घडण्याचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.