एसटीच्या पहिल्या महिला चालकाने घेतले स्टेरिंग हातात
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एका महिलेने सासवड ते नीरा मार्गावर बस चालवत आपल्या नावाची नोंद केली आहे. अर्चना अत्राम असे या महिला चालकाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान अर्चना अत्राम या सासवड डेपोतून निरासाठी बस घेऊन निघाल्या होत्या. अनेक प्रवासी अर्चना यांना चालकाच्या सीटवर पाहून थक्क झाले.
यानंतर अनेकांना त्यांचा व्हिडिओ काढण्याचा मोह आवारता आला नाही. अर्चना अत्राम यांनी पहिल्यांदाच बसचे स्टेअरिंग हातात घेत प्रवाशांना सुरक्षितपणे आपल्या थांब्यावर पोहोचविण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. बुधवारपासून पुणे विभागात सहा महिला चालक म्हणून रुजू झाल्या आहेत. सध्या अर्चना यांचा बस चालवितानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होत आहे. याबद्दल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विटकरून अर्चना यांचे अभिनंदन केले.
नवी जबाबदारी तुझी, एसटी प्रवाशांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची...
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) June 8, 2023
आजच्या दिवशी महाराष्ट्रातील एसटीच्या इतिहासात राज्यातील पहिल्या महिला एसटी चालक मा.अर्चना अत्राम यांच्या नावाने इतिहास लिहिला गेला आहे. त्यांनी सासवड ते नीरा (जेजुरी मार्गे ) या मार्गे बस चालवली आहे. राज्य महिला… pic.twitter.com/DI2sprcMtL
चाकणकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “नवी जबाबदारी तुझी, एसटी प्रवाशांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची... आजच्या दिवशी महाराष्ट्रातील एसटीच्या इतिहासात राज्यातील पहिल्या महिला एसटी चालक मा. अर्चना अत्राम यांच्या नावाने इतिहास लिहिला गेला आहे. त्यांनी सासवड ते नीरा (जेजुरी मार्गे ) या मार्गे बस चालवली आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने पहिल्या एसटी महिला चालक मा. अर्चना आत्राम यांचे मनःपूर्वक अभिनंदन.”