आंधळ्या प्रेमाने केला घात, नवरदेवाची वरात तुरुंगात

बोगस कागदपत्र तयार करीत अल्पवयीन मुस्लीम मुलाशी हिंदू मुलीचा विवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार चिंचवड गावात उघडकीस आला आहे. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर संबंधित मुलगा त्याच्या कुटुंबीयासह या प्रकरणात आर्थिक, अन्य मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 9 Jun 2023
  • 12:53 am
आंधळ्या प्रेमाने केला घात, नवरदेवाची वरात तुरुंगात

आंधळ्या प्रेमाने केला घात, नवरदेवाची वरात तुरुंगात

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

बोगस कागदपत्र तयार करीत अल्पवयीन मुस्लीम मुलाशी हिंदू मुलीचा विवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार चिंचवड गावात उघडकीस आला आहे. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर संबंधित मुलगा त्याच्या कुटुंबीयासह या प्रकरणात आर्थिक, अन्य मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचवड गावातील व्यावसायिक असणाऱ्या कुटुंबाची मुलगी येथीलच एका शाळेत २०२० साली शिक्षण घेत होती. तेव्हा आरोपींपैकी मेहबूब लियाकत शेख नामक व्यक्तीने तिला फूस लावण्यासाठी संबंधित मुलाला आर्थिक ताकद दिली. २० जून २०२० मध्ये तक्रारदार व्यक्तीच्या मुलीला पळवून नेण्यात आले. विशेष म्हणजे याबाबत तिचे अपहरण झाल्याची तक्रार वडील देत असताना चिंचवड पोलिसांनी तसा गुन्हा दाखल करून घेतला नसल्याचे आत्ता चिंचवड पोलिसांनीच दाखल केलेल्या गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे.

मुलीचे अपहरण, धर्मांतर आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे निकाहनामा केल्याचे तक्रारदार यांना समजले होते. त्यामुळे मुलीचे वडील संबंधित मुलाच्या घरी गेले असता, मुलीला अन्यत्र ठेवल्याचे समजले. तसेच मुलाचे वय कमी असल्याने बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड, खोटे मुद्रांक, खोटा निकाहनामा आणि खोट्या स्वाक्षरी करून मुलगा २१ वर्षांचा नसताना त्याचे हिंदू मुलीशी लग्न लावून दिले, असे मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

मंचर येथे नुकताच असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलीला उत्तर प्रदेशमध्ये पळवून नेल्यानंतर तिच्यावर बलात्कार करून, लग्न करत तिला मुस्लीम धर्माप्रमाणे राहण्यास लावल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीने चार वर्षांनी मूळ गावी पुण्यातील मंचर येथे आल्यावर तक्रार दिली असून, संबंधित मुलाला अटक करण्यात आली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला होता. दरम्यान या प्रकरणी २२ वर्षीय मुलावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मंचर येथील पीडित तरुणीची ओळख तिच्या मैत्रिणीच्या भावाशी झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले होते. पीडित मुलीच्या घरच्या मंडळींना माहिती मिळाल्यावर आरोपी तरुणाला समज देखील देण्यात आली होती. मात्र त्यानंतर आरोपी मुलाने पीडित मुलीस फूस लावून पळवून उत्तर प्रदेशला घेऊन गेला होता. त्या घटनेला जवळपास चार वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर आता चिंचवड गावातील तीन वर्षांपूर्वीचा प्रकार उघड झाला आहे. चिंचवड गावातील मुलीशी जवळीक साधत तिच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने आणि ती हिंदू असल्यानेच तिचे लग्न लावून दिल्याचे तिच्या वडिलांचे म्हणणे असून, त्यांनी दिलेल्या फिर्यादी नंतर फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Share this story

Latest