ताडीवाला रोड भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढविण्याची मनसेची मागणी
पुणे शहरातील ताडीवाला रोड लोकसेवा वसाहत परिसर भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून दररोज काही ना काही छोट्या-मोठ्या भांडणांच्या घटना घडताना दिसत आहे. त्यामुळे या भागात पुढील काळातही अशा काही घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा या घटनांमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या भागातील झोपडपट्टी दादा, गुंडांमुळे येथील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरो जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर याभागात पोलिसांना गस्त वाढविण्याची मनसेकडून मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर महिला अध्यक्षा वनिता बाबू वागस्कर यांच्यावतीने बंड गार्डन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांच्याकडे या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी मनसे महिला विभाग अध्यक्षा रुचिका शेळके, मनसे विभाग अध्यक्ष अजय कदम तसेच ताडीवाला रोड भागातील नागरिक उपस्थित होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.