Pune Metro schedule
पुणे : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. उद्या रविवार (१० सप्टेंबर) रोजी पुणे मेट्रो एक तास उशीराने धावणार आहे. तांत्रिक कारणामुळे दोन्ही मार्गिकांवरील प्रवासी सेवा सकाळी ६:०० वाजता ऐवजी ७:०० वाजतापासून उशीरा सुरु होणार आहे, अशी माहिती पुणे मेट्रोकडून देण्यात आली आहे. हा बदल केवळ एक दिवसाठी असणार असल्याचे मेट्रोकडून सांगण्यात आले.
लाईन -१ (पीसीएमसी ते सिव्हील कोर्ट मेट्रो स्थानक) व लाईन -२ (वनाझ ते रुबी हॉल मेट्रो स्थानक) वरील प्रवासी सेवा सकाळी ६:०० वाजता ऐवजी सकाळी ७:०० वाजता (एक तास उशिरा) सुरू होईल, ह्याची सर्व प्रवाश्यांनी नोंद घ्यावी. सकाळी ७:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत प्रवासी सेवा नियमित सुरू राहील.
पुणे मेट्रोने आपली प्रवासी सेवा प्रवाशांच्या सोयीसाठी सकाळी एक तास लवकर सुरू केली होती. संबंधित बदल हा वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या मार्गावर लागू करण्यात आला होता.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.