पक्षाचा नव्हे मतदारांचा जाहीरनामा

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगले आहे. सर्व राजकीय पक्षांकडून जाहीरनामा प्रसिद्ध केला जात आहे. सत्ताधारी महायुतीकडून आत्तापर्यंत केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडण्यात येत आहे. तर सत्तेवर आल्यास काय करणार याची माहिती महाविकास आघाडीकडून दिली जात आहे.

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगले आहे. सर्व राजकीय पक्षांकडून जाहीरनामा प्रसिद्ध केला जात आहे. सत्ताधारी महायुतीकडून आत्तापर्यंत केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडण्यात येत आहे. तर सत्तेवर आल्यास काय करणार याची माहिती महाविकास आघाडीकडून दिली जात आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह मतदारसंघात घरोघरी जाऊन निवडून आल्यास काय करणार याची माहितीपुस्तिका देत आहे. या पार्श्वभूमीवर खकवासला मतदारसंघाती मतदारांनीच जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यात त्यांना काय हवे आहे, याची जंत्रीच मांडण्यात आलेली आहे. हा जाहीरनामा सध्या सोशल मीडियावर मतदारांचा जाहीरनामा तुफान व्हायरल होत आहे  

खडकवासला चौपाटीचा विकास करण्याची मागणी जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. खडकवासला चौपाटीला हजारो पर्यटक दररोज भेट देतात. येथील खाद्यपदार्थांच्या गाड्या, पार्किंग, चौपाटी यावर येथे बरेच काम करावे लागणार आहे.पुणे प्रस्तावित रिंग रोडचे काम जलद्‌गतीने पूर्णत्वास नेणे खूप आवश्यक आहे.

तरी यावर आमच्या लोकप्रतिनिधींनी वैयक्तिक लक्ष घालणे आवश्यक आहे. वेल्हे-रायगड कोकण मार्ग जलदगतीने पूर्णत्वास न्यावा, यामुळे पुण्यातील पर्यटकांना कोकणमध्ये लवकर पोहोचणे शक्य होईल. तसेच ताम्हिणी मार्गावरील ताणही कमी होईल.२०२१ ला पीएमआरडीएचा विकास आराखडा सादर करण्यात आला असून त्यावर सुनावण्या पूर्ण होऊन तीन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. परंतु अजूनही तो पूर्णत्वास जाऊ शकलेला नाही.

पीएमआरडीए प्रशासन, पालिका प्रशासन यांची उदासीनता आणि राजकीय श्रेयवाद यामुळे आमचा विकास लांबतोय, याची एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यास जाणीव असावी. जीएसटीचे भूत सध्या व्यापाऱ्यांच्या गळ्यातील फास बनला आहे. जीएसटीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करणे आवश्यक असल्याचे मतदारांनी नमूद केले आहे.  

पुणे-बंगलोर हायवेवरील खेड शिवापूर येथील टोलनाका हलवण्यात यावा. केतकावळे, नारायणपूर, बनेश्वर येथे पर्यटकांना आर्थिक भुर्दंड पडू नये. यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपले प्रयत्न आपण करावेत, अशी अपेक्षा या जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आली आहे.लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आवश्यक असून त्यासाठी नागरिकांना भेटणे आवश्यक आहे.

परंतु सध्या केवळ उदघाटने, वाढदिवस, लग्नसमारंभ यात लोकप्रतिनिधींचा जास्त वेळ वाया जात आहे. तरी हा वेळ आपण वाचवून थेट नागरिकांना भेटनेचे नियोजन करावे. कार्यकर्त्यांची गर्दी ही राजकीय क्षेत्रात टिकून राहायचे असल्यास कुणालाही आवश्यकच आहे. परंतु नागरिकांना भेटताना ही गर्दी दूर ठेवता आली तर बरे. 

महापालिकेने नवीन गावे २०२२ मध्ये समाविष्ट करून घेतली. तसेच मनपाचा ५ वर्षांचा कार्यकाळ संपून २ वर्षे उलटली. येथील नागरिकांना गेले २ वर्षे स्थानिक पातळीवर कोणीही लोकप्रतिनिधी उपलब्ध नाही ही अतिशय निंदनीय बाब आहे. शासकीय कामामध्ये होणारी दिरंगाई सर्वज्ञात आहे. याबाबत आपली भूमिका काय आहेत, शासकीय कार्यालयातील कामांची दिरंगाई यावर आपल्याकडे काय उपाययोजना आहेत/ असा सवालही मतदारांनी उपस्थित केला आहे.

एक मतदार म्हणून आम्हाला आपल्याकडून याच अपेक्षा आहेत. बारसे, वाढदिवस, लग्न समारंभ, उदघाटन, मैत, दहावे, तेरावे यातील आपल्या उपस्थितीपेक्षा आम्हाला एक सक्षम लोकप्रतिनिधी हवा आहे. आपण हेच कार्य करणे अपेक्षित आहे. आम्हाला नुसताच चमकणारा लोकप्रतिनिधी नको असून मतदारांचे दैनंदिन जीवन सुकर करणारा लोकप्रतिनिधी हवा आहे, याची सर्व भावी लोकप्रतिनिधींनी नोंद घ्यावी, असे मतदारांच्या जाहीरनाम्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story