पुणे विभागीय रेल्वे रुग्णालयात मॅंडीबुलर सबकाँडाइल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पडली पार
पुण्याचे विभागीय रेल्वे रुग्णालय समर्पण आणि कठोर परिश्रमाने रुग्णांना शक्य तितकी सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. रुग्णांना आजारपणामुळे होणारा त्रास कमी होऊन ठणठणीत बरे होण्यासाठी शक्य तितकी सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा आणि औषधे दिली जातात. आज पुण्याच्या विभागीय रेल्वे रुग्णालयात आव्हानात्मक प्रकरणात अशी एक यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मँडिब्युलर सबकाँडाइलने ग्रस्त असलेल्या रुग्णावर ओपन रिडक्शन आणि इंटरनल फिक्सेशन (ओआरआयएफ) शस्त्रक्रिया करण्यात आली . ही शस्त्रक्रिया 05तास 45 मिनिटे चालली.
रुग्णाला पाच दिवसांपूर्वी शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाला शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नसल्याने शस्त्रक्रिया न करताच त्याला रेल्वे रुग्णालयात पाठवण्यात आले. रेल्वे रुग्णालयातील डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारून रेल्वे रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शल्यचिकित्सक आणि भूलतज्ञ यांचेसाठी ही एक आव्हानात्मक केस होती.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे व त्यांची प्रकृती झपाट्याने सुधारत आहे. पुण्याच्या रेल्वे रुग्णालयात ही शस्त्रक्रिया तीस हजार रुपयांमध्ये इम्प्लांट आणि सर्जन शुल्कासह केली गेली. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी पॅनेल /खाजगी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केल्यास अंदाजे 06 लाख रुपये खर्च झाले असते.
वरील शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी डॉ. प्रणय कुडे, डॉ. अंकित साह, डॉ.मिलिंद एनडी, डॉ. अंकिता, डॉ. नवीन यांच्यासह नर्सिंग आणि सपोर्ट स्टाफसह रेल्वे डॉक्टरांच्या चमूने शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले आणि योगदान दिले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह , मुख्य वैद्यकीय अधीक्षक सजीव यांच्यासह रेल्वे डॉक्टर, अधिकारी यांनी या स्तुत्य कार्याबद्दल पुणे रेल्वे रुग्णालयाच्या टीमचे अभिनंदन केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.