संग्रहित छायाचित्र
यंदा जुलै महिन्यात आलेल्या पावसामुळे पूरस्थिती उद्भवल्यानंतर महापालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. या प्रकरणातील नाट्यानंतर आता शहरातली पूरस्थिती रोखण्यासाठी महापालिका सरसावली असून आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर सिंहगड रस्ता परिसरासह शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पूरस्थितीला अनेक कारणे देण्यात येत होती. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नेमके कारण समजून घेण्यासाठी महापालिकेने तीन सदस्यीय समिती जुलै महिन्यात नेमली होती. या समितीने अहवाल सादर केल्यानंतर या उपाययोजना केल्या जातील असे सांगण्यात आले होते. परंतु अहवाल जनतेसाठी खुला केला जात नसल्याने पुणेकरांकडून टीका केला जात होती. त्यानंतर महापालिकेने हा अहवाल खुला केला. त्यानुसार आता शहरातली पूरस्थिती रोखण्यासाठी महापालिका सरसावली असून आयुक्तांनी उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानंतर आता शहरात पूर परिस्थितीवर नियंत्रण राहण्यासाठी वर्षभर आधीच नियोजन करण्याचे आदेश डॉ. भोसले यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत.
खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर नदीचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले होते. नागरिकांचे संसार पाण्यात वाहून गेले होते. नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तसेच विसर्गामुळे सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी, विठ्ठलवाडी, निंबजनगर परिसर डेक्कन, खिलारे वस्ती, पाटील इस्टेट या परिसरातही पूर परिस्थिती उद्भवली होती. हा पूर आल्याने महापालिका आणि जलसंपदा विभागातही आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यात सुमारे साडेचारशे कुटुंबे बाधित झाली. या परिस्थितीला महापालिका, जलसंपदा विभाग आणि नदीपात्रात टाकण्यात आलेला राडारोडा तसेच नदी सुधार प्रकल्पाचे काम जबाबदार असल्याचे समोर आले आहे.
पूर परिस्थितीसाठी अनेक नवनवीन कारणे पुढे आणली जात होती. त्यामुळे पूर परिस्थितीचे नेमके कारण शोधून काढत त्यावर कामयस्वरूपी उपाययोजना करण्याचे नियोजन महापालिकेकडून केले जाणार होते. पुण्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घटनास्थळी यावे लागले होते. त्यानंतर पालिकेने महापालिकेने तीन सदस्यांची समिती जुलै महिन्यात नेमली होती. या समितीने सुचविलेल्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी आयुक्तांनी नुकतीच बैठक बोलविण्यात आली होती.
दरम्यान, या बैठकीत आयुक्तांनी याबाबत सूचना केल्या आहेत. या शिवाय, शहरात अनेक भागांत पर्जन्यमापक बसवावे, त्याची नोंद आपत्कालीन परिस्थिती विभागाकडे करावी, अशा प्रकारच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.
२९ ठिकाणच्या नागरिकांचे करणार तात्पुरते स्थलांतर
पुणे शहरात पूरबाधित होणाऱ्या २९ ठिकाणांच्या नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतरासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. त्यासाठी आतापासून जागांची निश्चिती कराव्या, अशा सूचनाही महापालिका आयुक्तांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिल्या आहेत. गेल्या काही वर्षांत शहरात अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात टेकड्यांच्या भागात वारंवार पूरस्थिती उद्भवत आहे. त्यातच नदीची वहनक्षमता घटल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडल्यानंतर नदीकाठ परिसरातही पूरस्थिती निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन ही बैठक घेण्यात आली. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., शहर अभियंता प्रशांत वाघमारे, समितीचे सदस्य, जलसंपदा विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.