पुणे मेट्रोच्या वीजपुरवठ्याशी महावितरणचा संबंध नाही
पुणे, दि. १५ ऑक्टोबर २०२३: पुणे महामेट्रो सेवामधील व्यत्ययांसाठी वीजपुरवठा खंडित झाल्याचे कारण सांगत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष महावितरणला जबाबदार ठरविण्यात येत आहे. तथापि, मेट्रोच्या वीजपुरवठ्याशी महावितरणचा कोणताही संबंध नाही. पुणे महामेट्रोला महावितरणकडून (MSEDCL) नव्हे, तर महापारेषण (MSETCL) कंपनीकडून १३२ केव्ही दाबाचा वीजपुरवठा केला जातो असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शुक्रवारी (दि. १३) सकाळी साडे अकराच्या सुमारास वनाज ते रूबी हॉल मार्गावरील सेवा २१ मिनिटे बंद पडली होती. मात्र विजेच्या मागणीत वाढ झाल्यामुळे यंत्रणेवरील भार (LOAD) वाढल्याने महावितरणकडून वीजपुरवठा अचानक बंद झाल्याचा दावा मेट्रोकडून करण्यात आला आहे. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, महावितरणचा पुणे मेट्रोच्या वीजपुरवठ्याशी कोणताही संबंध नाही, असा खुलासा महावितरणकडून करण्यात आला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.