लक्ष्मी चौक ते कासारसाई रस्त्याने घेतला मोकळा श्वास
पुणे : मौजे हिंजवडी (Hinjewadi) येथील लक्ष्मी चौक (Laxmi Chowk) ते शिंदे वस्ति चौक मारुंजी (Kasarasai) येथील रस्त्याच्या हद्दीमधील अतिक्रमणे व अनाधिकृत बांधकाम यांचे सुमारे ७५०० स्क्वेअर फुट अतिक्रमणे निष्कासन कारवाईमध्ये हटविण्यात आली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वाहतूक विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत संयुक्तिकपणे ही लरवाई करण्यात आली.
या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. या कारवाईमुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. कारवाई करताना पीएमआरडीए च्या अधिकारी मोनिका सिंग यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी तसेच वाहतूक व पीडब्ल्यूडी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
रस्त्याला अडथळा करणारे लक्ष्मी चौक ते कासारसाई वरील अतिक्रमण तसेच मौजे मान ते मानदेवी मंदिर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी स्वतः रस्त्यामध्ये अतिक्रमण असलेली सर्व बांधकामे काढून घेण्याचे आवाहन सहआयुक्त मोनिका सिंह यांनी केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.