Jangli Maharaj Road : गेल्या ४९ वर्षांपासून एकही खड्डा न पडलेला जंगली महाराज रस्त्यावर पडला १० फुटाचा खड्डा

पुणे : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे पुणेकर त्रासले आहेत. शहर खड्डे मुक्त कधी होणार तसेच चांगले रस्ते कधी मिळणार असा प्रश्न महापालिकेला विचारला जातो. त्यावेळी जंगली महाराज रस्त्याप्रमाणे शहरातील रस्ते तयार करु असा दावा करुन गेल्या ४९ वर्षात एकही खड्डा न पडलेला रस्ता म्हणून जंगली महाराज रस्त्याचे उदाहरण दिले जात होते.

गेल्या ४९ वर्षांपासून एकही खड्डा न पडलेला जंगली महाराज रस्त्यावर पडला १० फुटाचा खड्डा

पुणे : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे पुणेकर त्रासले आहेत. शहर खड्डे मुक्त कधी होणार तसेच चांगले रस्ते कधी मिळणार असा प्रश्न महापालिकेला विचारला जातो. त्यावेळी जंगली महाराज रस्त्याप्रमाणे शहरातील रस्ते तयार करु असा दावा करुन गेल्या ४९ वर्षात एकही खड्डा न पडलेला रस्ता म्हणून जंगली महाराज रस्त्याचे उदाहरण दिले जात होते. आता त्याच रस्त्यावर १० फुटाचा खड्डा पडल्याने महापालिकेला धक्का बसला आहे. 

महापालिकेकडून व्हिआयपी रस्ते तयार केले जात आहे. हे रस्ते तयार करताना जंगली महाराज रस्त्याचे उदाहरण समोर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे चांगल्या रस्त्याचा हा उत्तम नमुना असल्याची उदाहणे दिली जातात. या रस्त्यावर खड्डे पडणार नाही, असा विश्वास ठेकेदाराने महापालिकेला दिला होता. फक्त एक अट यामागे ठेवण्यात आली होती. ती म्हणजे या रस्त्यावर खोदकाम करु नये. त्याप्रमाणे महापालिकेने या ती अटी पाळण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे या रस्त्यावर खड्डे पडले नाही. मात्र शहरातील मुख्य रस्ता असलेल्या या सदगुरु जंगली महाराज रस्त्यावरील एका पावसाळी चेंबरला छोटासा खड्डा  पडला होता. त्या खड्ड्याची निरीक्षण करताना आतमध्ये बघितले असता, रस्त्याच्या खालच्या बाजूला सर्व भाग पोकळ झाला होता, यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. या बाबतची माहिती मनसे राज्य संघटक प्रमुख प्रशांत कनोजिया यांनी तात्काळ महापालिकेचे पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्या निर्देशनास आणुन दिली. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. त्यावेळी चेंबरचे बांधकाम निष्कृष्ठ झाल्याने १० बाय १०  फुटाचा तयार झाल्याचे दिसून आले. दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करण्यात आले. 

गेल्या वर्षी पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे डेक्कन जिमखाना, जंगली महाराज रस्ता, गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर भयानक पूर स्थिती निर्माण झाली होती. स्मार्ट सिटी अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून ही स्थिती ओढावल्याने नागरिकांनी महापालिकेवर संताप व्यक्त केलाच होता. त्यामुळे या भागात पावसाळी गटारांची क्षमता वाढविण्यासाठी पाच कोटी रुपयांचा आराखडा मलःनिसारण विभागाने तयार केला होता. त्यानुसार कामे केली जात आहेत.

मोठी दुर्घटना टळली
जंगली महाराज रस्ता हा शहरातील मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच रस्ता चांगला असल्याने वाहनांचा वेग देखिल अधिक असतो. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याची माहिती वेळीच समजली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

जंगली महाराज रस्त्यावरील चेंबरजवळ पडलेल्या खड्ड्याची माहिती पथ विभागाला मिळाली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यात येवून तात्काळ कामाची सुरवात करण्यात आली आहे. काम केले जात असताना वाहतूक कोंडी होणार नाही, याची काळजी घेण्यात आली. एकाने बाजूने वाहतूक सुरळीत करण्यात आली होती.
- अनिरुध्द पावसर, पथ विभाग प्रमुख, महापलिका. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest