प्रसिद्ध ज्वेलर्सवर आयकर विभागाकडून छापेमारी
पुणे : पुणे शहरात (Pune) आज सकाळी गुरुवार (दि.१९) रोजी आयकर विभागाने छापेमारी (Income Tax Department raids) केली आहे. शहरातील प्रसिद्ध ज्वेलर्सवर ही छापेमारी करण्यात आली. छापेमारीसाठी आयकर आधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा दाखल झाला असून शहरातील पत्र्या मारुती चौक, हडपसर मगरपट्टा, बाणेर या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. या कारवाईनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
View this post on Instagram
शहरातील प्रसिद्ध निळकंठ ज्वेलर्सवर (Nilakant Jewellers)आयकर विभागाच्यावतीन पहाटेपासून छापेमारी सुरू आहे. याशिवाय निळकंठ ज्वेलर्सच्या मालकाच्या घरी देखील आयकर विभागाची टीम दाखल झाली आहे. तसेच बाणेर हडपसर भागात सुद्धा पहाटेपासून आयकर विभागाची कारवाई सुरु केली आहे.
जवळपास ४० अधिकारी या कारवाईसाठी दाखल झाले असून, मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे. पुणे शहरासह देशातील १४ ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. एका समुहाच्या तीन कंपन्यांवर ही छापेमारी करण्यात आली आहे. या कारवाईत पाच कोटींची रोकड मिळाली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.