प्रसिद्ध राजाराम मंडळाच्या सजावटीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ
लाडक्या गणरायाचे लवकरच आगमण होणार असून पुणेकरांकडून गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच पुण्यातील भव्य सजावटीसाठी प्रसिद्ध असलेल्या छत्रपती राजाराम मंडळाच्या गणेशोत्सव सजावटीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आज शनिवार (दि. २६) रोजी पार पडला आहे. यंदा छत्रपती राजाराम मंडळाकडून शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिराची प्रतिकृती उभारणात येणार आहे.
आमदार रवींद्र धंगेकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, बीव्हीजी उद्योग समूहाचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष दीपक मानकर, उद्योजक आणि भाऊ रंगारी मंडळाचे कार्याध्यक्ष पुणे बालन, मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, भाजपचे राजेश पांडे, माजी नगरसेवक अजय खेडेकर, शिल्पकार सुप्रिया शिंदे आदींच्या उपस्थितीमध्ये मांडवाचे पूजन करत सजावटीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला.
छत्रपती राजाराम मंडळ यंदा 132 वर्ष साजरे करत असून यंदा शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिराची प्रतिकृती मंडळाच्या वतीने उभारण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे अमन विधाते हे ही प्रतिकृती साकारत आहेत गेल्या अनेक वर्षापासून सदाशिव पेठ सारख्या भागात उत्तम काम केलं जात असल्याने तेथील नागरिकांनीही ते स्वीकारला आहे.
उत्सवाचे पावित्र्य जपण्याचे काम मंडळ करत असल्याचं दीपक मानकर यांनी सांगितलं. मला म्हटलं चालायचं नाही नागरिकांनी एकत्र यावयासाठी उत्सव भाऊ रंगारी लोकमान्य टिळक यांनी सुरू केला त्याचा उद्देश सफल झाला असला तरी उत्सवातील दाही दिवस मंडळांनी प्रबोधनावर भर दिला पाहिजेत आणि राजाराम मंडळ ते करेल याबद्दल मला खात्री असल्याचे श्रीकांत शेटे यांनी यावेळी सांगितलं फक्त मिरवणूक म्हणजे हा उत्सव नाही हेही लक्षात घ्यायला हवे असे ते म्हणाले मंडळाच्या वैशिष्ट्यपूर्ण हँगिंग मांडवाची उपस्थितानी प्रशंसा केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.