'शेअर मार्केट' भुलभुलैय्यात अडकले शेकडो गुंतवणूकदार
पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक घेऊन शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदन नगर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार सप्टेंबर २०२१ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधी दरम्यान खराडी आणि मुंबई येथील एफ ट्रेड सेल्स एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कार्यालयात घडला.
भरत सोपान पठारे, अंजली भरत पठारे, ज्ञानेश्वर आढाव उर्फ माऊली, महेश चव्हाण, अनुराग मिश्रा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील भरत पठारे आणि ज्ञानेश्वर आढाव हे रेकॉर्डवरील आहेत. याप्रकरणी अनुराधा रामनाथ शिंदे (वय ३५, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी संगणमत करून एफ ट्रेड सेल्स एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मुंबई आणि खराडी येथे कार्यालय सुरू केले.
या कंपनीच्या मार्फतीने लोकांची फसवणूक करण्याचा कट रचला. फिर्यादी शिंदे आणि अन्य ८९ गुंतवणूकदारांना त्यांच्या कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्यांना जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला या सर्वांना थोड्या प्रमाणात परतावा देण्यात आला. त्यानंतर मात्र कोणताही परतावा न देता पैशांचा अपहार करून सर्वांची तीन कोटी ३९ हजार लाख १२ हजार ६३७ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) पाटील करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.