घोरपडी गाव येथे घरामधे आग
पुणे : आज सकाळी साडेनऊ वाजता सर्वे नंबर 71, बालाजी नगर, घोरपडी गाव, पुणे या ठिकाणी तीन मजली इमारतीत दुसऱ्या मजल्यावर आग (Fire) लागल्याची वर्दि मिळताच अग्निशमन दलाकडून बी.टी.कवडे रोड अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते. (Pune Fire)
जवानांनी घटनास्थळी पोहोचताच पाहणी केली असता दुसरया मजल्यावरील एका घरामधे आग लागून मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता. जवानांनी घरामधे कोणी आहे का याची खातरजमा करत बी ए सेट (श्वसन उपकरण) परिधान करुन आगीवर पाण्याचा मारा सुरू केला व सुमारे दहा मिनिटात आग आटोक्यात आणत पुर्ण विझवली व धोका दुर केला. तसेच त्याचवेळी घरातील गॅस सिलेंडर जवानांनी तातडीने घराबाहेर घेतला. या घटनेत कोणी जखमी नसून घरातील देवाजवळ तेलाचा दिवा चालू ठेवून घरातील रहिवाशी कामानिमित्त बाहेर गेल्याने आग लागली होती. या घटनेत देवाचा देव्हारा ,गृह उपयोगी साहित्य ,कपडे, बॅगा महत्त्वाची कागदपत्रे पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत.
या कामगिरीमध्ये तांडेल संदीप रणदिवे व महेंद्र कुलाळ व वाहनचालक बजरंग लोखंडे तसेच जवान शरद नवगिरे, गौरव कांबळे यांनी सहभाग घेतला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.