पुणे मुंबई द्रुतगती मार्ग (एक्स्प्रेस वे) अडोशी टनेलच्या अगोदरपासून अमृतांजन ब्रिजपर्यंत व पुण्याच्या दिशेला खंडाळाकडे 10 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जुन्या मार्गावर खोपोली हद्दीत बोरघाटात शेकडो वाहने बंद आहेत.
मोठ्या संख्येने महिला, लहान मुले रस्त्यावर बसून आहेत. टोविंग वॅन, मेकॅनिकच्या प्रतीक्षेत प्रवासी खोळंबले आहेत.
शनिवार व रविवारला जोडून तसेच ख्रिसमस सुट्टी आल्याने सलग सुट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबई आणि पुणेकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे शनिवार सकाळपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर खालापूर टोल नाका व खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे महामार्ग पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस आणि रायगड पोलिसांचा अतिरिक्त कुमक लावून कोंडी सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे.