हडपसर : भरधाव कारने सफाई कर्मचारी महिलेला चिरडले

भरधाव कारने सफाई कर्मचारी महिलेला चिरडलेल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात पुण्यातील हडपसर-सासवड रोडवर सकाळी साडेसातच्या सुमारास घडला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 5 Jun 2023
  • 12:25 pm
Accident : भरधाव कारने सफाई कर्मचारी महिलेला चिरडले

भरधाव कारने सफाई कर्मचारी महिलेला चिरडले

कारच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

भरधाव कारने सफाई कर्मचारी महिलेला चिरडलेल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात पुण्यातील हडपसर-सासवड रोडवर सकाळी साडेसातच्या सुमारास घडला आहे.

छाया भजनदास शिंदे (वय ४२, रा. आकाशवाणी, हडपसर) असे मृत्यु झालेल्या कर्मचारी महिलेचे नाव आहे. छाया शिंदे या रस्ता झाडण्याचे काम करतात. सकाळी साडेसातच्या सुमारास त्या हडपसर येथील सातववाडी येथे काम करत होत्या.

यावेळी पुण्यावरून सासवडच्या दिशेने एक कार जात होती. मात्र, भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे, रस्ता दुभाजकाला धडकली. त्यानंतर झाडाला धडकून कारची छाया शिंदे यांना धडक बसली. या अपघातात छाया यांचा जागीच मृत्यु झाला. या अपघाताची माहिती मिळताच हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. मात्र, कार चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. हडपसर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share this story

Latest