Gairan land : वाघोलीवासीयांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
पुण्यातील वाघोली येथील असंघटित कष्टकरी कामगारांच्यावतीने आज (बुधवारी) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला आहे. गायरान जमीनीतील एक गुंठा जमीन प्रत्येकाला मिळावी आणि सातबारा प्रत्येकांच्या नावाचा व्हावा, या मागणीसाठी वाघोली ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून वाघोलीमधील गायरान जमीनीवरती असंघटित कामगारांनी मोठ्या प्रमाणावर घरे बांधलेली आहे. ही घरे अतिक्रमण करून बांधलेली असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. आता या गायरान जमीनीवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. मात्र, कारवाई न करता प्रत्येकाला एक गुंठा जमीन द्यावी या मागणीसाठी हे सर्व रहिवासी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आहेत.
"जमीन आमच्या हक्काचे नाहीत कोणाच्या बापाची", “गायरान जमीन मिळालीच पाहिजे”, “सातबारा नावचा झालाच पाहिजे”, अशा प्रकारच्या घोषणा यावेळी मोर्चात देण्यात आल्या आहेत. या मोर्चा मोठ्या प्रमाणात महिला व पुरुषांनी सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे भर उन्हात रस्त्यावर आपल्या हक्कासाठी महिला आणि पुरुष आंदोलनात सहभागील झाल्याचे चित्र होते.