कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक
पुणे : फायनान्स कंपनीमधून कर्ज मिळवून देतो असे सांगत प्रोसेसिंग आणि करारनामा फीच्या नावाखाली २० लाख ६० हजार रुपये उकळण्यात आले. याप्रकरणी चंदन नगर पोलिसांनी चार जणांनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नरेश राम अहिरे, कुमार परीक्षित, श्वेता उंडे, धीरज तुकाराम पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी राजाराम तुकाराम चौधरी (वय ५९, रा. चौधरी कॉम्प्लेक्स, चंदन नगर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपींनी चौधरी यांना फायनान्समधून कर्ज मिळवून देतो असे आमिष दाखवले. त्याच्याकडून वेळोवेळी वीस लाख ६० हजार रुपये उकळले. त्यांना कर्ज मिळवून न देता आणि पैसे परत न करता फसवणूक करण्यात आली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.