Pune Weather Update : शहराच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी

पुणे: आज शहराच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. वारजे, सिंहगड रोड, नांदेड सिटी, कात्रज,आंबेगाव पठार, लोहगाव या भागांत वेगवान वाऱ्यांसह पाऊस पडला. अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरीकांची तारांबळ उडाली.

संग्रहित छायाचित्र

पुणे: आज शहराच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वारजे, सिंहगड रोड, नांदेड सिटी,  कात्रज,आंबेगाव पठार, लोहगाव या भागांत वेगवान वाऱ्यांसह पाऊस पडला. अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरीकांची तारांबळ उडाली. पावसाने हजेरी लावल्याने उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. 

तसेच पुण्यातील कात्रज घाट परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कात्रज घाट परिसरात महामार्गावर पाणी साचले आहेत. 

हवामान विभागाने ने ११ मे पर्यंत हवामान ढगाळ असेल असा अंदाज व्यक्त केला असून १२ आणि १३ मे रोजी पुणे शहरातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest